JOIN US
मराठी बातम्या / Viral / रागात तरुणाचा भयंकर प्रताप! केळ्याला Condom लावून अख्खं गिळलं; 24 तासांत...

रागात तरुणाचा भयंकर प्रताप! केळ्याला Condom लावून अख्खं गिळलं; 24 तासांत...

रागात व्यक्तीने जे केलं ते पाहून डॉक्टरही हैराण झाले.

जाहिरात

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

वॉशिंग्टन, 31 जानेवारी : राग आल्यानंतर व्यक्ती काय करेल याचा नेम नाही. तसं सामान्यपणे रागात व्यक्ती चिडचिड करते, दुसऱ्यांवर भडकते, कुणालाही काहीही वाईट बोलते, तोडफोड करते, काहीवेळा स्वतःला किंवा इतरांनाही नुकसान पोहोचवते. पण अमेरिकेतील एका व्यक्तीने रागात जे केलं ते इतकं धक्कादायक आहे, ज्याचा कधी कुणी विचारही केला नसेल. या व्यक्तीने चक्क कंडोम लावलेलं केळं खाल्लं आणि त्यानंतर त्याची भयंकर अवस्था झाली. 35 वर्षांची ही व्यक्ती जिला राग आला आणि रागात ती नको तेच करून बसली. या व्यक्तीने कंडोम लावलेलं केळं खाल्लं आणि त्यानंतर त्याची अशी अवस्था झाली की डॉक्टरही हैराण झाले. कंडोम लावलेलं केळं खाल्ल्यानंतर काही वेळाने या व्यक्तीच्या पोटात तीव्र वेदना होऊ लागल्या, त्याला उलट्या सुरू झाल्या. तो काहीही खाऊपिऊ शकत नव्हता. पाणी पिणंही त्याला मुश्किल झालं होतं. 24 तास ना त्याला लघवी होत होती ना त्याला शौचालयाला जाता येत होतं. त्याची अवस्था इतकी भयंकर झाली की त्याला कुटुंबाने रुग्णालयात दाखल केलं. हे वाचा -  पुरुषांनो, तुम्हाला माहिती आहे का महिलांना सर्वात जास्त कोणता कंडोम आवडतो? डॉक्टरांनी त्याचं सिटी स्कॅन केलं तेव्हा त्यांनाही धक्का बसला. त्याच्या आतड्यांजवळ कंडोम गुंडाळलेलं केळं दिसलं. त्यामुळे त्याच्या आतड्यांचा मार्ग बंद झाला होता. आतडं फाटायलाच आलं होतं. डॉक्टरांनी सांगितलं की, कंडोममध्ये असल्याने केळं तुटत नव्हतं. आतड्यांना ते पचवणं कठीण झालं होतं. त्यामुळे त्याला वेदना होऊ लागल्या.

अखेर डॉक्टरांनी सर्जरी करण्याता निर्णय घेतला. जवळपास एक तास ऑपरेशन झालं. त्याच्या आतड्यांमधील ते केळं बाहेर काढण्यात आलं. तीन दिवसांनंतर त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता त्याला काही समस्या नाही. तो आता सर्वकाही आरामात खाऊ-पिऊ शकतो आहे. डॉक्टरांनी त्याला कमी फाइबरयुक्त पदार्थ खाण्याचा सल्ला दिला आहे.

हे वाचा -  अविवाहित, व्हर्जिन पुरुषाने Private part सोबत केला नको तो खेळ; पाहून डॉक्टरही शॉक न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार जगातील हे प्रकरण असल्याचं सांगितलं जातं आहे. क्युरियस मॅगझिनमध्ये हे प्रकरण पब्लिश करण्यात आलं आहे.

रिपोर्टमध्ये या व्यक्तीने नेमकं कोणत्या रागातून इतकं धक्कादायक कृत्य केलं ते रागाचं कारण मात्र सांगण्यात आलेलं नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या