नको असलेली गर्भधारणा टाळण्यासाठी आणि लैंगिक आजारापासूनही सुरक्षेसाठी शारीरिक संबंध ठेवताना कंडोमचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो. पण कंडोममुळे शारीरिक सुखाचा आनंद हवा तसा मिळत नाही, असं अनेकांना वाटतं. मात्र तज्ज्ञांच्या मते, कंडोम लावूनही शारीरिक सुखाचा आनंद घेता येतो. बाजारात असे बऱ्याच प्रकारचे कंडोम आहेत ज्यामुळे तो आनंद तुम्हाला मिळेल. पण मी कोणता कंडोम घेऊन, तिला तो आवडेल का, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. कंडोम घेताना शक्यतो पार्टनरची आवडही लक्षात घ्या. कोणता कंडोम लावल्याने जास्तीत जास्त लैंगिक सुख मिळेल त्यानुसार कंडोम निवडा. सामान्यपणे स्मॉल डॉट असलेला कंडोममुळे जास्तीत जास्त समाधान मिळतं. रिब कंडोमवरील मार्किंगमुळे शारीरिक संबंधांचा आनंद द्विगुणित होतो.