JOIN US
मराठी बातम्या / Viral / VIDEO: सेल्फीच्या नादात समोरुन येणारं संकटही नाही दिसलं; बकरीनं महिलेला थेट जमिनीवर आपटलं

VIDEO: सेल्फीच्या नादात समोरुन येणारं संकटही नाही दिसलं; बकरीनं महिलेला थेट जमिनीवर आपटलं

या अजब व्हिडिओमध्ये (Viral Video) दिसतं, की महिला बकरीसोबत सेल्फी किंवा व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, ही बकरी थोडी रागात होती

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 04 सप्टेंबर : काही लोकांना कुठेही फोटो क्लिक (Photo) करण्याची आणि व्हिडिओ (Video) बनवण्याची सवय असते. तुम्ही अशा अनेक बातम्या वाचल्या किंवा ऐकल्या असतील की सेल्फीच्या (Selfie) नादात लोकांसोबत गंभीर दुर्घटना घडली. सध्या ट्विटरवरही असाच एक व्हिडिओ व्हायरल (Video Viral on Twitter) होत आहे. यात दिसतं, की बकरीसोबत सेल्फी घेणं एका महिलेला चांगलंच महागात पडलं आहे. पत्नी गरोदर राहिल्यानं कंडोम कंपनीकडे केली तक्रार; अधिकाऱ्यांनी ठेवली विचित्र अट सोशल मीडिया (Social Media) साईट ट्विटरवर एका महिलेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या अजब व्हिडिओमध्ये दिसतं, की महिला बकरीसोबत सेल्फी किंवा व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करत आहे. बकरीपासून माणसाला काही धोका असेल असा विचार शक्यतो कोणी करत नाही. मात्र, ही बकरी थोडी रागात होती. तिनं अनेकदा महिलेवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, महिलेला हा इशारा समजला नाही.

संबंधित बातम्या

VIDEO - एवढासा जीव पण शेवटपर्यंत लढली; खारूताईमुळे चक्क सिंहाची दमछाक ही महिला व्हिडिओ शूट करण्यात इतकी व्यग्र होती की तिला बकरीचा मूडही लक्षात आला नाही. बकरीनं अनेकदा प्रयत्न केल्यानंतर अखेर या महिलेवर आपल्या शिंगांनी हल्ला (Goat Attacks on Woman) केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे महिलेचा तोल गेला आणि ती जमिनीवर कोसळली. हा व्हिडिओ आतापर्यंत 4 लाखाहून अधिकांनी पाहिला आहे. अनेकांनी यावर कमेंट करत महिलेला भरपूर दुखापत झाली असणार अशी शक्यता व्यक्त केली आहे. तर काहींनी म्हटलं, की या महिलेच्या कृत्यामुळे बकरी चिडली असावी.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या