मुंबई, 10 मार्च : काही दिवसांपूर्वी हत्ती आणि म्हशीचा (Elephant Vs Buffalo) एक मजेशीर व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यात एक हत्ती मुद्दामहून म्हशीशी पंगा घेतो. त्यामुळे म्हैसही चवताळते आणि हत्तीवर हल्ला करते (Elephant Buffalo Video). पण या हल्ल्यात दोघांचाही एकमेकांना हानी पोहोचवण्याचा उद्देश नव्हता. आता अगदी याच्या उलट असा हत्ती-म्हशीचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात हत्तीने म्हशीवर खतरनाक हल्ला केला आहे. हत्तीच्या हल्ल्यात म्हशीचा मृत्यूही झाला आहे (Elephant attack on Buffalo). हत्ती सर्वात अवाढव्य प्राणी. पण शरीराने तो जितका मोठा तितकाच तो शांत स्वभावाचा. पण जर तो चवताळला तर मग काही खरं नाही. त्यांच्यासमोर सिंह, वाघ, बिबट्या अशा प्राण्यांचंही काही चालत नाही. संतप्त हत्तींचे असे काही व्हिडीओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील. अशाच हत्तीचा हा व्हिडीओ आहे. ज्यात हत्तीने रागात एका म्हशीचा जीव घेतला आहे. हे वाचा - शिकारीला आलेल्या मगरीची माकडांनी केली भयंकर अवस्था; पुन्हा कधीच घेणार नाही पंगा व्हिडीओत पाहू शकता एक म्हैस एकटीच एका ठिकाणी शांत, आरामात बसलेली दिसते आहे. जणू ती थकली आहे आणि आरामासाठी थांबली आहे, असंच दिसून येतं. त्याचवेळी तिच्यासमोरून एक हत्ती येतो. हत्तीला येताना पाहताच म्हैस थोडी सावध होती. हत्ती चवताळलेला आहे हे तिच्या लक्षात येतं. आता हा हत्ती आपल्यावर हल्ला करणार हे तिला समजतं. त्यामुळे हत्ती आपल्याजवळ येऊन आपल्यावर हल्ला करण्याआधी इथून गेलेलंच बरं असा विचार करून ती हत्ती तिच्यापर्यंत पोहोचण्याआधीच तिथून पळते.
पण म्हशीला फार वेगाने पळणं काही जमत नाही. ती हत्तीपासून दूर जाण्याआधी हत्ती तिच्या जवळ येतो आणि तिच्यावर हल्ला करतो. आधी आपल्या सोंडेने धक्का देत तिला जमिनीवर पाडतो. त्यानंतर तिला आपल्या सोंडेत धरतो आणि जमिनीवर आपटत राहतो. म्हशीला त्याच्या तावडीतून सुटणं शक्यच होत नाही. व्हिडीओच्या शेवटी म्हैस एकाच ठिकाणी शांत पडलेली दिसते. तिच्या शरीराची हालचालच होत नाही. हे वाचा - VIDEO - तहानलेला होता साप; तरुण स्वतःच्या हाताने पाणी पाजायला गेला आणि… हत्तीने इतका भयंकर हल्ला केला आहे की म्हशीचा जागीच जीव गेला. तरी हत्ती तिला आपल्या सोंडेने दाबत राहतो. तिचा मृत्यू झाला आहे की नाही, हे निश्चित करतो. तिच्यात जीव नाही याची खात्री झाल्यानंतरच तो शांत होतो आणि तिथून निघून जातो. @Naji_alt नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.