JOIN US
मराठी बातम्या / Viral / शांत वाटणाऱ्या हत्तीचा भयंकर राग; गपचूप बसलेल्या म्हशीवर केला हल्ला, VIDEO मध्ये पाहा नेमकं काय झालं

शांत वाटणाऱ्या हत्तीचा भयंकर राग; गपचूप बसलेल्या म्हशीवर केला हल्ला, VIDEO मध्ये पाहा नेमकं काय झालं

एक म्हैस जंगलात एकटीच तिची ती आरामात बसली आहे. त्याचवेळी एका हत्तीची नजर तिच्यावर जाते आणि तो वेगाने धावत तिच्याकडे येतो. हत्ती आपल्याच दिशेने धावत येत असल्याचं पाहताचं म्हैस तिथून उठते आणि पळण्याचा प्रयत्न करू लागते. परंतु तोपर्यंत हत्ती म्हशीजवळ पोहोचतो आणि तिच्यावर हल्ला करतो.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 3 मे : जमिनीवरील सर्वात मोठा प्राणी असलेल्या हत्तीला सर्वात समजदारही मानलं जातं. हत्ती इतर प्राण्यांच्या तुलनेत अतिशय शांत, समजूतदार समजला जातो. जंगलात आपल्या कळपासोबत राहणं तो पसंत करतो, जेणेकरुन तो सुरक्षित राहू शकेल. शांत असला, तरी हत्तीला रागही येतो, अनेकांच्या याबाबतच्या घटना तुम्ही ऐकल्याही असतील. असाच एका हत्तीच्या रागाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हत्तीने एका म्हशीवर हल्ला केला आहे. या व्हिडीओमध्ये दिसतंय, की एक म्हैस जंगलात एकटीच तिची ती आरामात बसली आहे. त्याचवेळी एका हत्तीची नजर तिच्यावर जाते आणि तो वेगाने धावत तिच्याकडे येतो. हत्ती आपल्याच दिशेने धावत येत असल्याचं पाहताचं म्हैस तिथून उठते आणि पळण्याचा प्रयत्न करू लागते. परंतु तोपर्यंत हत्ती म्हशीजवळ पोहोचतो आणि तिच्यावर हल्ला करतो. म्हैस पळण्याचा प्रयत्न करते, पण तोपर्यंत हत्ती आपल्या सोंडेने तिला धक्का देवून खाली पाडतो. म्हैस जमिनीवर कोसळते. हत्ती म्हशीला धक्का मारुन, तिला जमिनीवर पाडून तेवढ्यावरच थांबत नाही, तर म्हैस जमिनीवर पडल्यावर हत्ती पुन्हा तिला सोंडेने मारू लागतो. तिला सोडेंने उचलून खाली आपटतोही. म्हशीला मारण्यासाठी हत्ती आपल्या गुडघ्यावर बसतो आणि सोंडेने म्हशीला चिरडण्याचा प्रयत्नही करतो.

(वाचा -  एका झडपेत किनाऱ्याजवळ झोपलेल्या मगरीवर बिबट्याचा हल्ला; पुढे काय झालं, पाहा VIDEO )

म्हैस, हत्तीच्या या हल्ल्यातून सुटण्याचा प्रयत्न करते. परंतु हत्तीच्या हल्ल्यातून तिची सुटका होत नाही. हत्ती म्हशीला ती गंभीर जखमी होईपर्यंत मारतच राहतो. म्हशीची त्याच्याकडून सुटका होत नाही. या हल्ल्यात म्हशीची स्थिती गंभीर होते आणि काही वेळातच ती निपचित पडते. म्हशीची हालचाल जोपर्यंत शांत होत, नाही तोपर्यंत हत्ती तिला मारतच राहतो आणि ती निपचित पडल्यावर तेथून निघून जातो.

हा व्हिडीओ क्रुगर सायटिंग्स नावाच्या यूट्यूब चॅनेलवर शेअर केला गेला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला 61 लाख 72 हजारहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या