JOIN US
मराठी बातम्या / Viral / पोटासाठी या वयातही करतायेत काम, वृद्ध व्यक्तीचा भावुक करणारा video

पोटासाठी या वयातही करतायेत काम, वृद्ध व्यक्तीचा भावुक करणारा video

सोशल माध्यमांवर दिवसभरात अनेक गोष्टी व्हायरल होतात. यामध्ये अनेक मजेशीर, विचित्र, धक्कादायक, भावुक करणारे व्हिडीओ पहायला मिळतात.

जाहिरात

भावुक करणारा व्हिडीओ

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 14 मे : सोशल माध्यमांवर दिवसभरात अनेक गोष्टी व्हायरल होतात. यामध्ये अनेक मजेशीर, विचित्र, धक्कादायक, भावुक करणारे व्हिडीओ पहायला मिळतात. सध्या असाच एक भावुक करणारा व्हिडीओ समोर आलाय जो पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल. या व्हिडीओने सध्या सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधलं आहे. सध्या अमृतसरचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ लोकांच्या हृदयाला भिडला आहे. आपलं पोट भरण्यासाठी एक वृद्ध व्यक्ती रस्त्यावर लिंबू सोडा विकत आहे. यांचा भावुक व्हिडीओ अनेकांच्या मनाला स्पर्श करुन जात आहे.

व्हिडीओमधील वृद्ध शीख अमृतसरच्या सुवर्ण मंदिराजवळ हातगाडी ठेवतात, ज्यांचे वय 80 आहे. ते 25 वर्षांपासून लिंबू सोडा विकत आहेत. त्यांना कोणी मुलगी मुलगी नसल्याने पोटाची खळगी भरण्यासाठी भीक मागण्यापेक्षा मला प्रामाणिकपणे काम करून उदरनिर्वाह करायला आवडते, असे ते सांगतात. 80 वर्षांच्या या आजोबांची दृष्टी कमी झाली आहे. त्यांना नीट ऐकू येत नाही, त्यांचे गुडघे काम करत नाहीत, तरीही ते या उन्हाळ्यात दिवसभर सोडा कार्ट घेऊन जातात. त्यांच्या हसण्याला आणि मेहनतीला मनापासून सलाम.

संबंधित बातम्या

@Hatindersinghr3 नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओवर खूप सारे लाईक्स आणि कमेंट येत आहेत. लोक त्यांना मदत करण्यासाठी कमेंट करत त्यांच्या पर्यंत पोहोचण्याचा पत्ता विचारत आहेत. ते मोबाईल वापरत नसल्यामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचणं थोडं अवघड होत असल्याचं व्हिडीओ शेअर करणाऱ्या व्यक्तीने सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या