JOIN US
मराठी बातम्या / Viral / VIDEO: विमानतळावर कुटुंबाच्या सामानात सापडली भयंकर वस्तू; उडाली एकच खळबळ, धावू लागले लोक

VIDEO: विमानतळावर कुटुंबाच्या सामानात सापडली भयंकर वस्तू; उडाली एकच खळबळ, धावू लागले लोक

एका अमेरिकन कुटुंबाला इस्रायलहून आपल्या देशात परतताना अतिशय धोकादायक गोष्ट सापडली, ज्याबद्दल त्यांना काहीही माहिती नव्हतं. यानंतर त्यांनी ही वस्तू आपल्यासोबत अमेरिकेला घेऊन जाण्याचा निर्णय घेतला, ही त्यांची सर्वात मोठी चूक होती

जाहिरात

प्रतिकात्मक फोटो

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 01 मे : अनेकदा लोक फिरायला जातात तेव्हा तिथून अशा वस्तू नक्कीच आणतात ज्यामुळे या सहलीची आठवण त्यांच्यासाठी नेहमी ताजी राहील. बहुतेकदा हे काही प्रकारची स्मृतीचिन्हे असतात, जी घरांमध्ये सुशोभित केली जातात. विशेषत: कोणी परदेश दौऱ्यावर गेल्यावर तिथून अशी स्मृतीचिन्हं नक्की आणली जातात. असाच विचार एका अमेरिकन कुटुंबाने इस्रायलहून आपल्या देशात परतताना केला होता. प्रवासात त्यांना एक अतिशय धोकादायक गोष्ट सापडली, ज्याबद्दल त्यांना काहीही माहिती नव्हतं. यानंतर त्यांनी ही वस्तू आपल्यासोबत अमेरिकेला घेऊन जाण्याचा निर्णय घेतला, ही त्यांची सर्वात मोठी चूक होती (Family Brought Unexploded Shell in Airport). 60 हजार रुपयात मिळतंय इतकं आलिशान घर; पण बेड पाहूनच पळून जातायेत लोक सीएनएनच्या रिपोर्टनुसार, हे संपूर्ण प्रकरण इस्रायलच्या बेन गुरियन विमानतळावरील आहे. नुकतीच या विमानतळावर अशी घटना घडली ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. अहवालानुसार, एक अमेरिकन कुटुंब त्यांच्या देशात परतण्यासाठी फ्लाइट पकडणार होतं, तेव्हा त्यांच्या सामानाची तपासणी केली असता यात टँकचं जिवंत शेल सापडलं (Family brought shell at Israel airport) . म्हणजेच, हे शेल फुटलेलं नव्हतं आणि यामध्ये गनपावडर होती.

हे शेल पाहून सुरक्षा कर्मचारी चक्रावले, तर विमानतळावर उपस्थित लोक इकडे तिकडे धावू लागले. ट्विटर यूजर अरुण बोथरा यांनी शेलचा एक फोटो पोस्ट केला आणि त्यासोबत एक व्हिडिओ शेअर केला. व्हिडिओमध्ये प्रवासी इकडे तिकडे धावताना दिसत आहेत.

शेलमुळे घबराट निर्माण झाली असून सर्वजण घाबरलेल्या अवस्थेत जीव वाचवण्यासाठी धावताना दिसत आहेत. लोक तातडीने विमानतळावरून पळून जाण्याचा प्रयत्न करत आहेत. राफ्टिंगदरम्यान नदीत कोसळल्या 2 तरुणी; ऋषिकेशमधील धक्कादायक घटनेचा LIVE VIDEO आता आम्ही तुम्हाला सांगतो की शेल या कुटुंबाच्या सामानात नेमकं कसं आलं. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी चौकशी केली असता, ते इस्रायलमधील गोलन हाइट्सला भेट देण्यासाठी गेले होते, तेव्हा तिथे त्यांना जिवंत शेल दिसलं. ते काय आहे, हेदेखील त्यांना माहीत नव्हतं. ते स्मृतीचिन्ह म्हणून घरी घेऊन जाण्याचा प्लॅन त्यांनी केला. त्यांनी ही माहिती दिल्यानंतर त्यांची कसून तपासणी करण्यात आली आणि त्यांच्या या माहितीवर विश्वास ठेवल्यानंतर त्यांना पुन्हा जाण्याची परवानगी देण्यात आली. इस्रायलच्या विमानतळावरील सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडेकोट असून ही घटना घडल्याने सगळेच हादरले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या