जाहिरात
मराठी बातम्या / Viral / 60 हजार रुपयात मिळतंय इतकं आलिशान घर; पण बेड पाहूनच पळून जातायेत लोक

60 हजार रुपयात मिळतंय इतकं आलिशान घर; पण बेड पाहूनच पळून जातायेत लोक

60 हजार रुपयात मिळतंय इतकं आलिशान घर; पण बेड पाहूनच पळून जातायेत लोक

जो कुणी हे घर पाहत आहे तो या घराच्या प्रेमात पडत आहे पण बेडरूम पाहताच मात्र पळ काढत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

लंडन, 01 मे : सध्या स्वतःचं घर घेणं असो किंवा भाड्याने. दोन्ही खिशाला परवडणारं नाही. अशात या फोटोत दिसणाऱ्या आलिशात घरात काही हजार रुपयांत राहण्याची संधी मिळते आहे. असं असताना या घराला एकही ग्राहक मिळत नाही आहे आणि याचं कारण आहे ते या घराचं बेडरूम. जो कुणी हे घर पाहत आहे तो या घराच्या प्रेमात पडत आहे पण बेडरूम पाहताच मात्र पळ काढत आहे (House on rent at 60 thousand rupees not get tenant). यूकेच्या शेफिल्डमधील हे घर भाड्यासाठी काढण्यात आलं आहे. एक आलिशान, सोयीसुविधांनी युक्त अशा या घराची जाहिरात देण्यात आली आहे. जाहिरातीनुसार या घरात एक मॉडर्न किचन आहे. ज्यात डिशवॉशरही अल्याचं सांगितलं आहे. सोबतच एक मोठं बाथरूम आहे. घराच्या आसपास बरीच झाडं लावण्यात आली आहे.  घराजवळ सर्व सेवा उपलब्ध आहे. शाळेपासून रेस्टॉरंट आणि बारपर्यंत सर्व काही आहे. अगदी वॉकिंग डिस्टन्सवर मार्केटही आहे.  बॅचलर किंवा कपलसाठी हे घऱ परफेक्ट असल्याचं जाहिरातीत सांगण्यात आलं आहे. हे वाचा -  ‘मी आलो नाही तर तुमची…’, शालेय विद्यार्थ्याचं Funny Leave Application वाचून पोट धरून हसाल इतक्या मोठ्या आलिशान घराचं भाडं फक्त 60 हजार रुपये महिना आहे. इतक्या सोयीसुविधांनी युक्त, मोक्याच्या ठिकाणी असलेलं इतक्या कमी किमतीत इतकं सुंदर घर असेल तर इथं राहायला कुणाला आवडणार नाही. पण याला एकही भाडेकरू मिळत नाही आहे. याचं कारण म्हणजे बेडरूम.

News18

जेव्हा लोक या घराचं बेडरूम पाहतात, तेव्हा त्यांना एखाद्या तेव्हा एखाद्या भयावह स्वप्नासारखं वाटतं आहे. बेडरूममधील बेड कोणत्याही कपलसाठी परफेक्ट आहे. पण हे बेडरूम इतकं लहान आहे की जेव्हा तुम्ही तिथल्या बेडवर झोपून उठाल तेव्हा तुमचं डोकं सिलिंगला नक्कीच आपटेल. हे वाचा -  पतीनं अचानक घटस्फोट दिल्यानं डिप्रेशनमध्ये गेली; अनेक वर्षांनी सोबतचे फोटो बघताना समजलं धक्कादायक कारण बेडरूमबाबत जे काही आहे, ते या जाहिरातीही सांगण्यात आलं आहे, जेणेकरून कुणी प्रत्यक्षात पाहिल्यानंतर फसवणुकीची तक्रार करू नये.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात