JOIN US
मराठी बातम्या / Viral / आता ऑफिसमध्येही बार! कार्यालयातच दारू मिळणार; बिनधास्त प्या, फुल्ल सरकारी परमिशन

आता ऑफिसमध्येही बार! कार्यालयातच दारू मिळणार; बिनधास्त प्या, फुल्ल सरकारी परमिशन

ऑफिसमध्ये दारू पिण्यासाठी सरकारने परवानगी दिली आहे.

जाहिरात

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

चंदीगढ, 13 मे :  ऑफिसमधील कर्मचारी कधी ना कधी दारू पार्टी करतात. यासाठी ते बाहेर बारमध्ये जातात. ऑफिसची वेळ संपल्यावर रोज थोडी थोडी घेणारेही कित्येक कर्मचारी आहेत. आता अशा कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज आहे. आता दारू पिण्यासाठी तुम्हाला बाहेर कुठे बारमध्ये जाण्याची गरज नाही. तर तुमच्या ऑफिसमध्येच आता बार असणार आहे. कार्यालयात दारू पिण्यासाठी सरकारनेच परमिशन दिली आहे. एरवी ऑफिसमध्ये तुम्हाला स्मोकिंग करण्यासही परवानगी नसते. पण आता तर तुम्हाला चक्क दारूच पिता येणार आहे. कार्यालयात दारू पिण्यापासून तुम्हाला कुणीच अडवू शकणार नाही. कारण सरकारनेच तसा नियम बनवत परवानगी दिली आहे.  ऑफिस कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये दारू पिता येईल. कार्यालयात बारही बनवता येतील.

राज्य सरकारने उत्पादन शुल्क धोरण 2023-24 मध्ये बदल केले आहेत. सरकारने 9 मे रोजी आपले नवीन उत्पादन शुल्क धोरण लागू केले. काय म्हणावं हिला! एक ग्लासभर दारू एका घोटात संपवली; तरुणीचं काय झालं पाहा VIDEO यानुसार किमान 5,000 कर्मचारी असलेल्या कॉर्पोरेट कार्यालयांमध्ये बिअर, वाइन अशा अल्कोहोलिक पेयांना परवानगी दिली आहे. अल्कोहोलिक ड्रिंक विकण्यास आणि पिण्यास परवानगी देण्यात आली आहे.  यासाठी L-10F परवाना दिला जाईल. पण याकरिता अनेक अटी आहेत. या अटींची पूर्तता केल्यानंतरच कॉर्पोरेट ऑफिसला हा परवाना मिळणार आहे. या धोरणाचा फायदा दारू व्यावसायिकांनाही होणार आहे. मद्यविक्रेत्यांना फायदा होण्यासाठी सरकारने रेस्टॉरंट, पब आणि कॅफेसाठी बार परवाना शुल्क कमी केले आहे. 5 मिनिटांत सुटेल बेवड्या नवऱ्याची दारू; हा घ्या सर्वात सोपा फॉर्म्युला पण तुम्हाला ही सुविधा जर तुम्ही हरयाणात असाल तरच मिळेल. कारण हा निर्णय हरयाणा सरकारने लागू केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या