प्रतिकात्मक फोटो
मुंबई : भारत हा विविधतेने नटलेला देश आहे असं आपण नेहमी म्हणतो, इथे वेगवेगळ्या जाती-धर्माचे लोक रहातात. त्यामुळे देशाच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या चालीरिती पाळल्या जातात. त्यामुळे भारतातच राहून आपल्याला येथील अर्धापेक्षा जास्त परंपरांबद्दल ठावूकच नसते. जगाच्यापाठीवर देखील अशा वेगवेगळ्या प्रकारच्या परंपरा आहेत. ज्या ऐकून कदाचित तुम्हाला विश्वास ठेवणंही कठीण होऊन बसेल. अशीच एक परंपरा बांगलादेशमध्ये सुरु आहे, येथे एका जमातीमध्ये एक विचित्र प्रथा आहे, ज्याअंतर्गत आपल्याच मुलीशी वडिल लग्न करतात. लग्नासाठी नवरा-बोयकोच्या वयात किती अंतर असावं? या जमातीचे लोक शतकानुशतके अशा वाईट प्रथेचे पालन करत आहेत, ज्याबद्दल जाणून तुम्ही देखील आश्चर्यचकित व्हाल. हे खरोखरच आश्चर्यकारक आहे. खरे तर या जमातीतील पुरुष जे मुलीला लहानपणापासूनच वडिलांप्रमाणे वाढवतात आणि मुली तरुण होताच तिचा नवरा बनतात. होय, हे विचित्र वाटेल पण हे खरे आहे. ही जमात बांगलादेशात आढळते, ज्याचे नाव मंडी आहे. या जमातीतील लोक विचित्र परंपरा पाळतात. इथे जेव्हा एखादा पुरुष तरुण वयात विधवा झालेल्या स्त्रीशी लग्न करतो, तेव्हा हे निश्चित होतं की तो पुरुष भविष्यात त्या स्त्रीच्या मुलीशीच लग्न करणार. ज्यामध्ये या महिलांना पहिल्या नवऱ्यापासून जर मुलगी झाली असेल, तर या मुलीशी तिचे सावित्र वडिल लग्न करतात आणि तिला आपली बायको बनवतात. मुलगी ज्याला लहानपणापासून आपला बाप मानते, ती मुलगी तरुण झाल्यावर त्याला आपला नवरा मानू लागते, ही गोष्ट फक्त विचार केला तरी किळसवाणं वाटतं, तर हे लोक ही प्रथा प्रत्यक्षात जगतात. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की ही प्रथा आजच्या काळातील नाही, तर ही शतकानुशतके पाळली जात आहे. मात्र, या दुष्ट प्रथेमध्ये वडील सावत्र बाप असणे आवश्यक आहे. वास्तविक किंवा खरे वडिल हे कधीही या प्रथेचा भाग बनत नाही. जेव्हा एखाद्या महिलेचा नवरा तरुण वयातच जातो आणि या महिलेला एक मुलगी असेल, तर अशाच महिलांशी शक्यतो हे पुरुष लग्न करतात आणि मग कालांतरणाने त्या महिलेच्या मुलीला देखील आपली बायको बनवतात.
या दुष्ट प्रथेबद्दल, या जमातीतील लोकांचा असा विश्वास आहे की एक तरुण पती आपली पत्नी आणि मुलगी दोघांचेही दीर्घकाळ संरक्षण करू शकतो. पण या परंपरेमुळे मंडी जमातीतील अनेक मुलींचे जीवन नरक बनले आहे.