JOIN US
मराठी बातम्या / Viral / 'या' व्यक्तीनं थाटला कापडी बाहुलीशी संसार, आता 3 मुलांचा झाला बाप

'या' व्यक्तीनं थाटला कापडी बाहुलीशी संसार, आता 3 मुलांचा झाला बाप

हा प्रकार कोलंबियातील बोगोटा येथील आहे. येथे राहणाऱ्या एका व्यक्तीने कापडी बाहुलीशी लग्न केल्याचे समोर आले आहे.

जाहिरात

सोर्स : सोशल मीडिया

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई : असं म्हणतात की प्रेमात आणि युद्धात सगळं काही मान्य आहे. ज्यामध्ये लोकांना काय बरोबर किंवा काय चुक हे दिसत नाही. अशीच काही प्रकरणं तुम्ही पाहिली देखील असतील, पण सध्या असं एक प्रकरण समोर आलं आहे, ज्याबद्दल ऐकून लोकांना विश्वास बसत नाहीय. काळ इतका पुढे गेला आहे की, अंतरजातीय लग्न, लेसबिअन लग्न आता कॉमन झालं आहे. पण तुम्ही कधी एका बाहुलीसोबत लग्न केल्याचं ऐकलं आहे का? एवढच नाही तर या खोट्या बाहुलीमुळे या व्यक्तीला मुलं देखील झाली आहेत. हे ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसला असेल.

हा प्रकार कोलंबियातील बोगोटा येथील आहे. येथे राहणाऱ्या एका व्यक्तीने कापडी बाहुलीशी लग्न केल्याचे समोर आले आहे. आता त्याने सोशल मीडियावर सांगितले की त्याची पत्नी आजारी आहे आणि तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ख्रिश्चनने आपल्या पत्नीचे नाव नताल्या असे ठेवले आहे. सोर्स : सोशल मीडिया

सोर्स : सोशल मीडिया

दोघांनीही लग्नानंतर आपल्या तीन बाहुल्या बाळांना जन्म दिला आहे. पण आता त्यांच्या नात्यात एक नवीन अपडेट आली आहे. या तरुणाचे म्हणणे आहे की मुलांच्या जन्मामुळे नताल्या अशक्त झाली आहे. यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या तरुणाने आपल्या पत्नीची हेल्थ अपडेट सोशल मीडियावर दिली आहे. नताल्याची तब्येत गेल्या काही दिवसांपासून सतत बिघडत आहे. या कारणामुळे तिला रुग्णालयात दाखल करावे लागले. तिला प्रचंड डोकेदुखी होत असून ती बेशुद्धही झाली, त्यानंतर त्याने रुग्णवाहिका बोलावून तिला रुग्णालयात दाखल केले. शिड्यांवरुन चिमुकला पडणार इतक्या मांजरीनं वाचवले प्राण, संपूर्ण प्रकार CCTVमध्ये कैद या व्यक्तीने पत्नीच्या उपचाराचा व्हिडीओ ऑनलाइन शेअर केला आहे. हे पाहून डॉक्टर आपला हशा आवरण्याचा प्रयत्न करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचबरोबर अनेकांनी त्यावर कमेंटही केल्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या