नवी दिल्ली 22 फेब्रुवारी : एखादा रेडा अतिशय भडकलेला असेल तर तो किती घातक ठरू शकतो याचं उदाहरण देणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल (Aggressive Bull Attacked on a Cyclist) होत आहे. ट्विटरवर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की रेड्याला राग येतो तेव्हा तो एका सायकलस्वारासोबत काय करतो. आकाशात झेप घेत गरुडांचा मनमोहक डान्स; VIDEO जिंकतोय नेटकऱ्यांची मनं काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामध्ये एक सायकल रेसिंग सुरू होती. यादरम्यान सायकिलिस्टसमोर एक रेडा आला. बैल यावेळी भरपूर भडकलेला होता. त्याने यासकिलिस्टचे जे हाल केले, ते तुम्ही व्हिडिओमध्ये (Shocking Video Viral) पाहू शकता.
या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या 29 सेकंदाच्या व्हिडिओ क्लिपमध्ये तुम्ही पाहू शकता की रेसदरम्यान रॉक कोब्लर नावाच्या सायकिलिस्टवर संपातलेल्या रेड्याने अचानक हल्ला केला. या बैलाने इतका भयंकर हल्ला केला की पाहणाऱ्यांचाही थरकाप उडाला. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की रेडा रॉक कोब्लरवर एकदा नाही तर दोन वेळा हल्ला करतो. रॉक पहिल्या हल्ल्यातून सावरण्याआधीच रेडा त्यांना पुन्हा आपल्या शिंगांवर उचलून जमिनीवर आदळतो. समुद्रात मस्ती करत होते लोक; इतक्यात अचानक पाण्यात कोसळलं हेलिकॉप्टर, LIVE VIDEO व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की भडकलेला रेडा सायकल रेसच्या रस्त्यात उभा राहातो. हा रेडा अतिशय रागात दिसतो. कारण त्याने याआधी आणखी दोन सायकिलिस्टवर हल्ला केलेला होता. रॉक कोब्लर त्याच्या जवळ येताच रेडा त्यांच्यावर अचानक हल्ला करतो. तो त्यांना हवेत फेकून जमिनीवर आदळतो.