JOIN US
मराठी बातम्या / Viral / एक नंबर आजी! ब्रेकअप झालेल्या नातीला दिला लय भारी सल्ला; VIRAL VIDEO एकदा पाहाच

एक नंबर आजी! ब्रेकअप झालेल्या नातीला दिला लय भारी सल्ला; VIRAL VIDEO एकदा पाहाच

आजीने नातीला दिलेला हा ब्रेकअपबाबतचा धडा सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.

जाहिरात

ब्रेकअपनंतर आजीचा नातीला सल्ला (फोटो - इन्स्टाग्राम व्हिडीओ ग्रॅब)

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 08 जून : ब्रेकअपनंतर कित्येकांची अवस्था खूप वाईट होते. कित्येक जण त्यातून लवकर बाहेर पडत नाही. अशीच एक ब्रेकअप झालेली तरुणी जिला तिच्या आजीने ब्रेकअपनंतर काय करायचं, त्या परिस्थितीतून कसं बाहेर पडायचं याबाबत जबरदस्त सल्ला दिला आहे. आजीने नातीला दिलेला हा ब्रेकअपबाबतचा धडा सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. सामान्यपणे प्रेम, ब्रेकअप वगैरे मोठ्या माणसांना पटतच नाही. पण या व्हि़डीतील आजी मात्र इतकी कूल आहे की तुम्ही विचारही केला नाही. प्रेमाला तर तिचा विरोध नाहीच पण ब्रेकअपनंतरही तिने अगदी शांतपणे आपल्या नातीची मनस्थिती सांभाळून घेतली. तिला काय करायचं ते सांगितलं. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता तरुणी आजीला सांगते की तिचं ब्रेकअप झालं आहे. तर दुःखही व्यक्त करायचं नाही का? त्यावर आजी तिला सांगते. कशाला दुःख व्यक्त करायचं. ज्याच्यासोबत ब्रेकअप झालं त्याला सोड. तो नाहीतर तुला आणखी दुसरी मुलं मिळतील. ब्रेकअप झालं आता लगेच दुसरा मुलगा शोधायला लाग. Wedding Video Viral : वरात दारात येताच उत्साही नवरी धावत बाल्कनीत गेली; पुढे असं काही घडलं की… @kamakaaziiii इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

आता असा सल्ला देणारी आजी नक्कीच कूल आहे की नाही? तुम्हाला काय वाटतं आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या