JOIN US
मराठी बातम्या / Viral / एक गाव असंही! जिथे चालतो त्यांचा स्वतःचा कायदा, पाहा कुठे आहे हे?

एक गाव असंही! जिथे चालतो त्यांचा स्वतःचा कायदा, पाहा कुठे आहे हे?

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असणारा देश म्हणून भारत ओळखला जातो. संसद इथे कायदे बनवते, आणि संपूर्ण देश त्या कायद्यानुसार चालतो. पण देशात असं एक गाव आहे, जिथे संसदेत बनवलेले कायदे चालत नाहीत.

जाहिरात

व्हायरल

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 13 फेब्रुवारी : जगातील सर्वांत मोठी लोकशाही असणारा देश म्हणून भारत ओळखला जातो. संसद इथे कायदे बनवते, आणि संपूर्ण देश त्या कायद्यानुसार चालतो. पण देशात असं एक गाव आहे, जिथे संसदेत बनवलेले कायदे चालत नाहीत. तुम्हाला आश्चर्य वाटेल, किंवा कदाचित काश्मीरमध्ये असं घडू शकेल, असा विचारही मनात येईल. पण तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल, हे गाव हिमाचल प्रदेशात आहे. या गावाला स्वतःचं संविधान आहे. गावाची स्वतःची संसद असून निकाल देणारी ‘न्यायव्यवस्था’ देखील आहे. चला तर, हे गाव कोणतं? हे जाणून घेऊया. हिमाचल प्रदेशात कुल्लू जिल्ह्यात 12 हजार फूट उंचीवर वसलेलं मलाना गाव अगदी अनोखं आहे. सुंदर डोंगरदऱ्यांनी वेढलेलं हे गाव जगभरातील लोकांसाठी आकर्षणाचं केंद्र आहे. हे गाव बऱ्याचदा तेथील विचित्र गोष्टींसाठी ओळखलं जातं. येथील रहिवासी स्वतःला अलेक्झांडरचे वंशज मानतात. गावातील मंदिरात अलेक्झांडरच्या काळातील तलवार ठेवल्याचं सांगितलं जातं. या गावाविषयी अनेक ऐतिहासिक कथा, रहस्यं आणि न सुटलेलं प्रश्न आहेत. सुमारे 1700 लोकसंख्या असलेलं हे गाव पर्यटकांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. हेही वाचा -  रोमँटिक वेडिंग फोटोशूट करताना कपलसोबत घडला भयंकर प्रकार, VIDEO VIRAL जमलू देवतेचा निर्णय अंतिम मलाना गावातही संसदेसारखी दोन सभागृह आहेत. वरच्या सभागृहात 11 सदस्य असून अंतिम निर्णय या सभागृहात होतो. सभागृहाच्या 11 सदस्यांपैकी गुरू, पुजारी आणि जमलू देवताचा प्रतिनिधी हे तीन सदस्य कायमस्वरूपी असून उर्वरित आठ सदस्य ग्रामस्थ निवडून देतात. प्रत्येक घरातून एक व्यक्ती सभागृहात येते. सभागृहात एखाद्या मुद्द्यावर चर्चा सुरू असताना जमलू देवतेचा शब्द हा शेवटचा असतो. सभागृहातील जमलू देवतेच्या प्रतिनिधीमार्फत ही देवता बोलते, अशी मान्यताही येथे आहे.

कडक नियमावली मलाना गावातील रहिवाशांनी बाहेरील लोकांशी फारसा संबंध ठेवायचा नाही, अशा स्वरुपाचे अतिशय कडक नियम येथे आहेत. या गावात भिंतींना स्पर्श करण्यास मनाई आहे. गावामध्ये पर्यटकही येऊ शकत नाहीत. गावातील मुलाशी दुसऱ्या गावातील मुलीचं लग्न होत नाही, किंवा गावातील मुलीचे दुसऱ्या गावातील मुलाशी लग्न केलं जात नाही. याचाच अर्थ येथे लग्नही गावामध्येच होतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, येथील लोक इतरांशी हस्तांदोलनही करीत नाहीत. इथल्या दुकानातून एखादी वस्तू घेतली, तर ग्राहकांकडून थेट पैसे घेण्याऐवजी दुकानदार ते पैसे खाली ठेवायला सांगतात, आणि मग उचलतात. मलाना गाव गांजाच्या लागवडीसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. या गावाच्या आजूबाजूला गांजा मोठ्या प्रमाणात लावला जातो, ज्या मलाना क्रीम म्हणतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या