व्हायरल
नवी दिल्ली, 12 मार्च : आजकाल रस्त्यावर होणाऱ्या अपघातांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. जगभरात सर्वाधिक लोकांचा मृत्यू अपघातात होतो. काही अपघात इतके भयानक असतात की अपघातानंतर उपचार मिळण्यापूर्वीच लोकांचा मृत्यू होतो. भयानक अपघातांचे अनेक व्हिडीओदेखील समोर येतात. जे पाहून तुमच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. सध्या घाईघाईने आणि भरधाव वेगात वाहन चालवल्याने बहुतांश अपघात होत आहेत. सध्या असाच एक अपघाताचा व्हिडीओ समोर आला आहे ज्यामध्ये एका वृद्ध माणसाचा जीव जाता वाचला. एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यामध्ये एक अपघात होताना दिसत आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती थोडक्यात बचावताना दिसत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये आपल्याला असेच एक दृश्य पाहायला मिळत आहे की, एक भरधाव कार रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या व्यक्तीकडे येते. या दरम्यान ती व्यक्ती स्वत:ला वाचवण्यासाठी मागे-पुढे पळत असते. त्यादरम्यान तो त्या गाडीला काही सेकंद आणि काही इंच अंतरावरून धडकण्यापासून वाचतो. गाडी रस्त्याच्या कडेला बांधलेल्या रेलिंगला धडकते. यामध्ये गाडीच्या पुढील भागाचा चकनाचूर झालेला दिसतोय.
व्हिडीओमध्ये वृद्ध व्यक्ती थोडक्यात बचावला. मात्र तो वाईटरित्या घाबरलेला दिसत आहे. @wpeoplesurvive नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला असून हा व्हिडीओ सध्या अनेकांच्या मनात धडकी भरवत आहे. व्हिडीओवर खूप कमेंटदेखील येत आहेत.
दरम्यान, अपघाताचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर सतत येत असतात. रस्त्यावर होणार्या अपघातांमध्ये काही जणांच्या नशिबामुळे जीव वाचल्याचेही दिसून येत आहे. त्यामुळे रस्त्यावर वाहने चालवताना आणि रस्त्यावर चालतानाही सावधानता बाळगण्याची जास्त गरज आहे.