JOIN US
मराठी बातम्या / Viral / चहाच्या दुकानात निवांत बसला होता; इतक्यात खिशातील फोन फुटला अन् भयंकर घडलं..धक्कादायक VIDEO

चहाच्या दुकानात निवांत बसला होता; इतक्यात खिशातील फोन फुटला अन् भयंकर घडलं..धक्कादायक VIDEO

एक व्यक्ती चहाच्या दुकानात बसलेला आहे. तो अगदी निवांत बसलेला असतानाच अचानक त्याच्या खिशात असलेल्या मोबाईलचा ब्लास्ट होतो. यानंतर मोबाईल आग पकडतो

जाहिरात

खिशातील फोन फुटला अन् भयंकर घडलं

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

तिरुवनंतपुरम 19 मे : आजकाल मोबाईल ही जणू प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अनिवार्य गोष्ट बनून गेली आहे. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच मोबाईल वापरताना अगदी दंग होऊन गेल्याचं अनेकदा पाहायला मिळतं. खरं तर या फोनने माणसाची अनेक कामं सोपी आणि सोयीस्कर केली. मात्र, फायद्यासोबतच याचे काही तोटेही आहेत, हे नक्की. याचाच प्रत्यय देणारी एक घटना नुकतीच समोर आली आहे. वाह दीदी वाह! ‘पापा की परी’ स्कुटी पार्क करायला गेली, थेट दुकानात घुसली, Video या घटनेचा व्हिडिओ आता समोर आलेला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही खिशात मोबाईल ठेवण्याआधी दहावेळा विचार कराल. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की एक व्यक्ती चहाच्या दुकानात बसलेला आहे. तो अगदी निवांत बसलेला असतानाच अचानक त्याच्या खिशात असलेल्या मोबाईलचा ब्लास्ट होतो. यानंतर मोबाईल आग पकडतो आणि या व्यक्तीच्या कपड्यांनाही आग लागते.

संबंधित बातम्या

सुदैवाने हा व्यक्ती अजिबातही वेळ न घालवता लगेचच उठतो आणि आपल्या खिशातील मोबाईल काढून काढू लागतो. मात्र आग लगेचच पसरल्याने त्याला हे शक्य होत नाही. इतक्यात तिथे उपस्थित असलेला दुसरा व्यक्ती लगेचच धावत मदतीसाठी येतो. शेवटी आग लागलेला हा फोन खिशातून बाहेर काढण्यात यश येतं. सुदैवाने या भयानक घटनेत वृद्धाला गंभीर दुखापत झालेली दिसत नाही. मात्र ही घटना अतिशय भयानक होती. ही घटना केरळच्या त्रिसूर जिल्ह्यातील मारोट्टीचलमध्ये घडली. ज्यात खिशातील फोन अचानक फुटला आणि त्याला आग लागली. ती व्यक्ती चहाच्या दुकानात बसली होती. मात्र, सुदैवाने आग तातडीने आटोक्यात आणण्यात यश आले. या घटनेचा व्हिडिओ पाहून तुम्हीही हैराण व्हाल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या