JOIN US
मराठी बातम्या / Viral / व्यक्तीने पकडला 9 फूट लांब साप; त्याने कॅमेऱ्यासमोरच केला हल्ला अन्..., अंगावर काटा आणणारा VIDEO

व्यक्तीने पकडला 9 फूट लांब साप; त्याने कॅमेऱ्यासमोरच केला हल्ला अन्..., अंगावर काटा आणणारा VIDEO

सापासोबत उभा असलेले जे ब्रेवर कॅमेऱ्यासमोर बोलताना दिसतात, मात्र त्यानंतर सापाने मागे वळून त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 10 मार्च : भारतातील बहुतेक प्राणीसंग्रहालयांमध्ये तुम्ही सर्व प्रकारचे प्राणी पाहिले असतील, परंतु सरपटणाऱ्या प्राण्यांचे संग्रहालय क्वचितच आढळतात. रेप्टाइल झूचे संस्थापक जय ब्रेवर अनेकदा त्यांच्या इंस्टाग्राम पेजवर धोकादायक साप आणि इतर प्राण्यांचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पोस्ट करतात. त्यांच्या अनेक क्लिपमध्ये ते कॅमेऱ्यासमोर सापांशी संवाद साधताना दिसतात. ते अजगरासारखा मोठा साप खांद्यावर घेऊन फिरत असल्याचं तुम्ही व्हिडिओमध्ये अनेकदा पाहिलं असेल. मांजरीला त्रास देणं सापाला भोवलं; शेवटी झाली अशी अवस्था की पाहून व्हाल शॉक..VIDEO इतकंच नाही तर ते भलीमोठी मगरही आपल्या खांद्यावर उचलून नेतानाही दिसले होते. अशात आता त्यांचा आणखी एक व्हिडिओ इंटरनेटवर चांगलाच व्हायरल झाला आहे. यात त्यांनी नऊ फूट लांब रॅट साप पकडला आहे. व्हिडिओमध्ये साप त्यांना चावण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. सापासोबत उभा असलेले जे ब्रेवर कॅमेऱ्यासमोर बोलताना दिसतात, मात्र त्यानंतर सापाने मागे वळून त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

संबंधित बातम्या

मात्र, या सर्व बाबींमध्ये जे ब्रेवर जाणकार असल्याने त्यांनी लगेचच स्वतःच्या हाताने सापाला नियंत्रित केलं. जे ब्रेवरने आपल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे की, “हा 9 फूट लांबीचा साप जगातील सर्वात मोठ्या रॅट सापांपैकी एक आहे. त्यांना किल्ड रॅट स्नेक म्हणतात आणि ते रियर फँग्ड ​​आहेत. याचा अर्थ त्यांना त्यांचं विष सोडण्यासाठी चावावं लागेल. हा एक सुंदर आग्नेय आशियाई साप आहे.”

व्हिडिओला 39,000 पेक्षा जास्त लाईक्स आणि आठ लाख व्ह्यूज मिळाले आहेत. ही क्लिप पाहिल्यानंतर, नेटिझन्स चिंतेत दिसले आणि कमेंट बॉक्समध्ये त्यांनी चिंता व्यक्त केली. एका व्यक्तीने लिहिलं, “हा रॅटल साप खूप वेगवान आहे. तो कधीही हल्ला करू शकतो.” दुसर्‍या इंस्टाग्राम वापरकर्त्याने लिहिलं, “हे खूप भयानक आहे. तो खूप लांब आहे.” तिसऱ्या वापरकर्त्याने लिहिलं, “ओएमजी खूप धोकादायक आहे.” चौथ्यानं लिहिलं, ‘बाबा! खूप भीतीदायक आहे."

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या