JOIN US
मराठी बातम्या / Viral / एका दुचाकीवर चक्क 7 जण, रील बनवणे पडले महागात, Viral Video पाहून पोलीसही थक्क, नेमकं काय घडलं?

एका दुचाकीवर चक्क 7 जण, रील बनवणे पडले महागात, Viral Video पाहून पोलीसही थक्क, नेमकं काय घडलं?

एका व्यक्तीच्या चालत्या दुचाकीवर बसून सात तरुणांनी रील बनवली.

जाहिरात

वाहतूक नियमांचे उल्लंघन

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अनुज गुप्ता, प्रतिनिधी उन्नाव, 2 जुलै : सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे. त्यामुळे दररोज शेकडो व्हिडिओ व्हायरल होत असतात. वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना सातत्याने दिसतात. यातच आता आणखी व्हिडिओ व्हायरल झाला. मात्र, दुचाकीवर बसून स्टंटबाजी करुन रील बनवणे तरुणांना चांगलेच महागात पडले आहे. नेमका हा प्रकार काय आहे, हे जाणून घेऊयात. नेमकं काय घडलं - दुचाकीवर बसून स्टंट करणे आणि रील्स बनवणे तरुणांना महागात पडले आहे. या दुचाकीवरून एक-दोन नव्हे तर सात तरुणांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी दुचाकीच्या क्रमांकाच्या आधारावरुन मालकाविरुद्ध 16 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. ही घटना उत्तरप्रदेशातील उन्नाव येथील आहे.

मऊ सुल्तानपुर येथील रहिवासी एका व्यक्तीच्या चालत्या दुचाकीवर बसून सात तरुणांनी रील बनवली. वाहतुकीचे सर्व नियम मोडत यांनी ही रील तयार केली. यानंतर त्यांनी तयार केलेली ही रील काही वेळातच व्हायरल झाली. त्यानंतर ही बाब स्थानिक पोलिसांच्याही निदर्शनास आली आणि दुचाकी क्रमांकाच्या आधारे पोलिसांनी विविध नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 16 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

उन्नाव सीओ सिटी आशुतोष कुमार यांनी सांगितले की, उन्नाव पोलिसांना सोशल मीडियाच्या माध्यमातून एक व्हिडिओ मिळाला होता. या व्हिडिओमध्ये सात तरुण दुचाकीवर बसून स्टंट करताना दिसले. बाइकचा नोंदणी क्रमांक UP 35 BE 9825 हा आहे. याबाबतची माहिती RTO ला देण्यात आली. यानंतर चौकशी करुन दुचाकी मालकावर मोटार वाहन कायदा कायद्यान्वये सुमारे 16 हजारांचे चलन करण्यात आले आहे. यासोबतच सीओ सिटी आशुतोष कुमार यांनी सांगितले की, तपास अधिकाऱ्यांना दुचाकीच्या मालकाचा शोध घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या संदर्भात त्यांचा जबाब घेण्यात येणार असून त्यानंतर कायदेशीर कारवाई केली जाईल. मात्र, या प्रकरणी पोलिसांनी व्हिडिओ बनवणाऱ्यांवर कोणतीही कारवाई केलेली नाही, अशीही माहिती मिळाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या