JOIN US
मराठी बातम्या / Viral / 6 वर्षाचा मुलगा यूट्यूबवर पाहून शिकला कार, 3 वर्षाच्या भावाला घेऊन निघाला आणि.....

6 वर्षाचा मुलगा यूट्यूबवर पाहून शिकला कार, 3 वर्षाच्या भावाला घेऊन निघाला आणि.....

लहान मुलं ही खूप निरागस आणि खोडकर असतात. घरात दिवसभर काहीना काही करामत करत राहतात. आजकालच्या मुलांचा जास्त वेळ तर मोबाईलवरच जाताना पहायला मिळतो.

जाहिरात

6 वर्षाचा मुलगा यूट्यूबवर पाहून शिकला ड्रायव्हिंग

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 16 मे : लहान मुलं ही खूप निरागस आणि खोडकर असतात. घरात दिवसभर काहीना काही करामत करत राहतात. आजकालच्या मुलांचा जास्त वेळ तर मोबाईलवरच जाताना पहायला मिळतो. खूप लहानगीही मोबाईलमध्ये वेगवेगळ्या गोष्टी पाहून तसंच करायचं पहायला बघतात. मात्र कधी कधी ते त्यांच्यासाठी धोकादायकही ठरतं. अशा अनेक घटना समोर आल्या आहेत जिथे लहान मुले मोबाईलमध्ये एखादी गोष्ट पाहून तसंच करायला बघतात आणि नंतर त्यांच्यासोबत विचित्र घडलं. अशीच एक घटना सध्या समोर आलीये. सध्या समोर आलेल्या घटनेत एका सहा वर्षाच्या मुलाने वडिलांची गाडी रस्त्यावर चालवली. यादरम्यान तो त्याच्या तीन वर्षांच्या भावालाही सोबत घेऊन गेला होता. हा मुलगा यूट्यूबवर पाहून कार चालवायला शिकला. अनेक दिवस युट्युबवर कार चालवतानाचे व्हिडीओ पाहिल्यानंतर त्याने वडिलांची गाडी काढून रस्त्यावर आणली. मुलांनी गाडी अडीच किलोमीटर चालवली आणि नंतर लॅम्प पोस्टवर धडकली. मात्र, या अपघातात दोन्ही मुले सुखरूप बचावली.

ही घटना मलेशियातून समोर आली आहे. या प्रकरणाच्या तपासादरम्यान हे समोर आलं. याशिवाय वडिलांना कार चालवताना ते पाहत असत. मुलाला याबद्दल विचारले असता तो किलबिलला आणि शेवटी त्याला गाडी कशी चालवायची हे कळले. तंत्रज्ञानामुळे लोकांचे जीवन सुकर होते पण त्याचबरोबर अनेक अडचणीही निर्माण होतात.

दरम्यान, सोशल मीडिया जेवढं चांगलं आहे तेवढंच वाईटही. त्यामुळे लहान मुलांना खूप कमी वयात मोबाईलची वाईट सवय लावू नये. अन्यथा अशा अनेक धक्कादायक घटना घडतात. यापूर्वीही अशा घटना समोर आल्या आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या