JOIN US
मराठी बातम्या / Viral / उत्खननात सापडली चक्क 5000 वर्षे जुनी बिअरची रेसिपी! अजून जे सापडलं ते वाचून व्हाल चकित

उत्खननात सापडली चक्क 5000 वर्षे जुनी बिअरची रेसिपी! अजून जे सापडलं ते वाचून व्हाल चकित

माणसाने अनेक नव्या गोष्टींचा शोध लावत बरीच प्रगती केली आहे. जंगलापासून शहरापर्यंत ते चंद्रापर्यंत खूप लांबचा पल्ला गाठला आहे. त्यामुळे नवनवीन गोष्टींच्या आधारे माणूस इथपर्यंत पोहोचला आहे.

जाहिरात

व्हायरल

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 20 फेब्रुवारी : माणसाने अनेक नव्या गोष्टींचा शोध लावत बरीच प्रगती केली आहे. जंगलापासून शहरापर्यंत ते चंद्रापर्यंत खूप लांबचा पल्ला गाठला आहे. त्यामुळे नवनवीन गोष्टींच्या आधारे माणूस इथपर्यंत पोहोचला आहे. आपण विज्ञानाच्या खूप जवळ आलो असलो तरी आपल्या पूर्वजांशी संबंधीत गोष्टी, जुन्या पुरातन गोष्टींचा शोध सुरु असून याविषयी अनेक गोष्टी समोर येत असतात. अशातच एका शहरातून 5000 वर्षे जुना फ्रिज सापडला आहे. पुरातत्व शास्त्रज्ञांच्या पथकाने सुमारे 5000 वर्षांपूर्वीच्या भोजनालयाचा शोध लावला आहे. दक्षिण इराकमधील नसिरिया शहराच्या उत्तर-पूर्वेला लागाशच्या अवशेषांमध्ये हा शोध लागला. सुमेरियन सभ्यतेच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे शहर मानले जाते. शहराला अल हिबा असे नाव देण्यात आले होते, उत्खननात येथून अनेक ऐतिहासिक गोष्टी सापडल्या आहेत. हेही वाचा -  Viral Video : हा व्हिडीओ पाहून जाईल पाणीपुरी खाण्याची इच्छा, तुम्हीच पाहा काय केलंय यावेळी इटालियन आणि अमेरिकन पुरातत्वशास्त्रज्ञांच्या टीमला जे सापडले आहे ते मोठे क्षेत्र आहे. बेंच, स्वयंपाकासाठी ओव्हन आणि समकालीन माशांची हाडे देखील येथे सापडली आहेत. आधुनिक फ्रीजसारखी एक प्राचीन रचना देखील समोर आली आहे. याचा उपयोग अन्न थंड ठेवण्यासाठी केला जात असे. या टीमचे प्रोजेक्ट डायरेक्टर, हॉली पिटमॅन यांच्या म्हणण्यानुसार, ‘येथून एक रेफ्रिजरेटर सापडला आहे आणि तेथे शेकडो भांडी देखील आहेत ज्यामध्ये अन्न दिले गेले होते. फ्रीजच्या मागे बसून अन्न शिजवण्यासाठी ओव्हनही सापडला आहे.

हॉली पिटमॅन यांच्या मते ही जागा घर नसून सामूहिक जागा होती, जिथे लोक येऊन खात-पिऊन जायचे. अशा स्थितीत पुरातत्वशास्त्रज्ञांच्या टीमने याला खानावळ म्हटले आहे आणि सुमेरियन सभ्यतेतील लोकांना बिअर पिणे आवडते असेही सांगितले आहे. उत्खननादरम्यान त्यांना बिअरची रेसिपीही सापडली आहे, जी दगडावर लिहिलेली होती. 2019 पासून या ठिकाणी उत्खनन सुरू असून पुरातत्वशास्त्रज्ञांना नवनवीन गोष्टी सापडत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या