JOIN US
मराठी बातम्या / Viral / ओ तेरी! 500 रुपयांची नोट भरून बनवला पराठा; तव्यावरून उतरताच 'चमत्कार' झाला

ओ तेरी! 500 रुपयांची नोट भरून बनवला पराठा; तव्यावरून उतरताच 'चमत्कार' झाला

पैशांच्या पराठ्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.

जाहिरात

पैशांचा पराठा.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 12 एप्रिल : आलू, कोबी असे किती तरी प्रकारचे पराठे तुम्ही खाल्ले असतील. पण तुम्ही कधी पैशां चा पराठा खाल्ला आहे का? सध्या सोशल मीडियावर अशा पराठ्याचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे, जो पाहून सर्वजण शॉक झाले आहे. 500 रुपयांची नोट भरून पराठा बनव्यात आला. तो तव्यावर शेकवण्यात आला. पण तव्यावरून हा पराठा खाली उतरताच चमत्कार झाला. हा व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. असा पराठा तुम्ही आयुष्यात कधी खाल्ला काय, पाहिलाही नसेल. 500 रुपयांच्या या पराठ्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. पराठ्यात 500 रुपयांची नोट भरणं हे धक्कादायक आहेच. पण त्यानंतर शेवटी हा पराठा खाताना जे घडलं ते तर यापेक्षाही शॉकिंग आहे. असा फॉर्म्युला पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे.

व्हिडीओत पाहू शकता सुरुवातीला एक महिला पोळपाटावर चपाती लाटते. त्यात ती 500 रुपयांची नोट ठेवते. चारही बाजूंनी चपाती बंद करून ती पुन्हा लाटून घेते. एकंदर ती 500 रुपयांच्या नोटेचा पराठा बनवते. पराठ्यात बटाटा किंवा इतर स्टफिंगऐवजी ती 500 रुपयांची नोट भरते. त्यानंतर तो पराठा तव्यावर तेल लावून शेकवतेसुद्धा. अद्भुत! भारतातील ‘या’ गावात आहे आंब्याचं चालणारं झाड; विश्वास बसत नाही तर पाहा VIDEO आता या पराठ्यातील 500 रुपयांच्या नोटेचं काय झालं असेल बरं? तुम्ही सांगाल का? ती नोट चपातीला चिकटली असेल, करपली असेल, खराब झाली असेल. पण इथं मात्र उलटंच घडतं.  हा शेकलेला पराठा ती तव्यावरून खाली काढते आणि खोलून दाखवते. तर काय त्यात नोट खराब होणं कसलं, 500 रुपयांची नोटही नाही. त्यातून चक्क 2000 रुपये निघतात. म्हणजे 500 रुपयांचा पराठा बनवून त्यातून 2000 रुपयांची नोट मिळते, असा हा पैसे कमवण्याचा फॉर्म्युला दाखवण्यात आला आहे. janu9793 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. अर्थात हा व्हिडीओ मजेशीर आहे. प्रत्यक्षात असं शक्य नाही, हे आपणा प्रत्येकाला माहिती आहे. बाबो! किंमत वाचूनच चक्कर येईल; सोन्याच्या भावाने विकले जात आहेत बटाटे; कारण… पण हा व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. पैसे कमवण्याचा असा फॉर्म्युला असता तर कुठेही जाण्याची गरजच पडली नसती. घरी बसून पराठे खाऊन ती व्यक्ती श्रीमंत होईल, अशा कमेंट या व्हिडीओवर येत आहेत. काही लोकांनी याला वेडेपणा म्हटलं आहे.

संबंधित बातम्या

तुमची या व्हिडीओवरील प्रतिक्रिया आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या