व्हायरल
नवी दिल्ली, 18 मार्च : आपण कायम तरुण दिसावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. प्रत्येक जण आपापल्या परीनं त्यासाठी प्रयत्न करतो; पण तारुण्य टिकवण्यासाठी विशेष काळजी घेणं खूप महत्त्वाचं असतं. चेहरा आणि शरीर तजेलदार दिसण्यासाठी केवळ सौंदर्यप्रसाधनांचा वापर करून उपयोग नाही. त्वचा सतेज राहण्यासाठी जीवनशैलीत योग्य बदल करणं आणि योग्य आहार घेणं महत्त्वाचं आहे. अमेरिकन डॉक्टर मार्क हायमन याच अनुषंगाने काम करत असून, वयाच्या 63व्या वर्षीही ते खूप तंदुरुस्त आणि निरोगी दिसतात. हे डॉक्टर तरुण दिसण्यासाठी नेमकं काय करतात, याची माहिती घेऊ या. ‘नवभारत टाइम्स’ने याबाबत वृत्त दिलंय. प्रत्येकाला एक दिवस म्हातारपण नक्की येणार, हे सगळ्यांनाच माहीत आहे. तरीही प्रत्येकाला कायम तरुण राहण्याची इच्छा असतेच. अर्थात बाह्य रूप म्हातारं होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही; पण तुम्हाला तुमचं आरोग्य तरुण राखता येऊ शकतं. डॉ. मार्क हायमन या तत्त्वावर काम करत आहेत. त्यांनी ‘यंग फॉरएव्हर’ नावाचं एक पुस्तकही लिहिलं आहे, यामध्ये तरुण राहण्याच्या अनेक टिप्स सांगण्यात आल्या आहेत; पण तरुण दिसण्यासाठी हे डॉक्टर काय करतात, हे तुम्हाला माहीत आहे का? हेही वाचा - तरुणीने ब्रेकऐवजी दाबला एक्सीलेटर, स्कूटीचं काय झालं पाहा, Video व्हायरल दररोज सात ते आठ तास झोप तारुण्य राखण्यासाठी दररोज 7-8 तासांची झोप महत्त्वाची आहे. डॉ. मार्क हायमन रात्री 10 वाजता झोपतात आणि सकाळी 6-7 वाजता उठतात. तसंच, ते झोपण्यापूर्वी मॅग्नेशियम घेण्यास विसरत नाहीत. तसंच ते घरामध्ये पूर्ण अंधार करून झोपतात. नियमित व्यायाम तंदुरुस्त आणि तरुण राहण्यासाठी डॉक्टर आठवड्यातून 4-5 दिवस व्यायाम करतात. यासाठी, ते रेझिस्टन्स बेड वापरतात. कारण यामुळे दुखापतीचा धोका कमी होतो. तसंच ते रोड बायकिंग, माउंटन बायकिंग, टेनिस, पोहण्याचा सरावही करतात.
प्रोटीन शेक हे अमेरिकन डॉक्टर फिट राहण्यासाठी व्यायामाकडे पूर्ण लक्ष देतात. त्यासाठी त्यांना प्रोटीनची गरज असते. हे मिळवण्यासाठी ते व्यायामाच्या 1 तास आधी प्रोटीन शेक घेतात.
योगासनं महत्त्वाची वाढत्या वयानुसार शरीराच्या लवचिकतेकडेही लक्ष दिलं पाहिजे. त्यासाठी हे डॉक्टर हॉट योगा आणि विन्यास योगा करतात. यामुळे शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्य सुधारतं. आहार नेमका कसा आहे? डॉ. मार्क हायमन शाकाहारी आणि त्यातही व्हीगन आहेत. ते फक्त वनस्पतींपासून उपलब्ध होणाऱ्या गोष्टींपासून बनवलेला आहार घेतात. या आहारात फायटोकेमिकल्सचं प्रमाण खूप जास्त असतं. तसंच वयानुसार आवश्यक पोषण योग्य प्रमाणात उपलब्ध होतं.