JOIN US
मराठी बातम्या / Viral / भररस्त्यात दोघींचा तुफान राडा, महिलेच्या डोक्यात फोडली काचेची बाटली अन्...

भररस्त्यात दोघींचा तुफान राडा, महिलेच्या डोक्यात फोडली काचेची बाटली अन्...

दोन महिलांमध्ये जबरदस्त हाणामारी झाल्याचं (2 Women Attacked One Another) पाहायला मिळालं. भररस्त्यात झालेल्या या हाणामारीचा व्हिडिओ तिथेच उपस्थित असलेल्या काही लोकांनी शूट केला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

लंडन 18 जून : नुकतंच एक हैराण करणारं प्रकरण समोर आलं आहे. यात दोन महिलांमध्ये जबरदस्त हाणामारी झाल्याचं (2 Women Attacked One Another) पाहायला मिळालं. भररस्त्यात झालेल्या या हाणामारीचा व्हिडिओ तिथेच उपस्थित असलेल्या काही लोकांनी शूट केला. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल (Video Viral) झाला आहे. ही घटना यूनायटेड किंगडमच्या (United Kingdom) लीड्स येथील आहे. महिलेनं तरुणीला मारहाण करत हिसकावला मोबाईल, घटनेचा VIDEO कॅमेऱ्यात कैद द सनमध्ये आलेल्या रिपोर्टनुसार, या मारहाणीदरम्यान एका महिलेनं दुसऱ्या महिलेच्या डोक्यावर काचेची बाटली फोडली. यामुळे पीडितेच्या डोक्यातून रक्त वाहू लागलं. यानंतर महिलेनं तुटलेल्या काचेनं पीडितेच्या गळ्यावरही वार केला आणि तिला जखमी करण्याचा प्रयत्न केला. याशिवाय महिलेनं एकमेकींना मारहाणही केली. यादरम्यान ओरडण्याचा आवाज ऐकून शेजारीही बाहेर आले. यानंतर महिलेचा पती आणि एका अन्य व्यक्तीनं हे भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. दोघींमध्ये भांडण का सुरू झालं, याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. बापरे! आंब्याच्या रक्षणासाठी 4 गार्ड अन् 6 श्वान तैनात, वाचा काय आहे कारण या मारहाणीदरम्यान तिथे उपस्थित एका व्यक्तीनं 999 वर कॉलवरुन पोलिसांना माहिती दिली. व्हिडिओच्या शेवटी पोलीस या पीडितेला तिथून घेऊन जाताना दिसतात. पोलिसांनी सांगितलं, की पीडितेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, उपचारानंतर तिला डिस्चार्ज देण्यात आला आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका व्यक्तीनं सांगितलं, की दोघींमध्ये भयंकर भांडण सुरू झालं. एकीनं हातामध्ये काठी घेतली होती तर दुसरीनं बाटली. या भांडणात एका महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या