JOIN US
मराठी बातम्या / Viral / स्वतःचा नवरा मृत्यूच्या दारात, बायकोने वाचवलं परपुरुषाला; कारण वाचून कौतुक कराल

स्वतःचा नवरा मृत्यूच्या दारात, बायकोने वाचवलं परपुरुषाला; कारण वाचून कौतुक कराल

असं दोन महिलांनी आपल्या पतीसोबत केलं आहे. ज्यांनी आपल्या नवऱ्याऐवजी दुसऱ्या महिलेच्या पतीचा जीव वाचवला आहे.

जाहिरात

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 21 एप्रिल : जेव्हा आपली प्रिय व्यक्ती संकटात असेल तर सामान्यपणे आपण त्या व्यक्तीच्या मदतीसाठी धावून जातो. पण सध्या एक असं प्रकरण चर्चेत आलं आहे, ज्यामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे. स्वतःचा नवरा मृत्यूच्या दारात असताना त्याच्या बायकोने मात्र दुसऱ्या महिलेच्या नवऱ्याचा जीव वाचवला आहे. असं एक नव्हे तर दोन महिलांनी केलं आहे.  तसं हे वाचून प्रत्येकाला राग येईल पण यामागील खरं कारण समजलं तर तुम्हीही या महिलांचं कौतुक कराल. ना त्यांच्यामध्ये रक्ताचं नातं होतं ना कोणते मैत्रीचे संबंध. त्यांचा धर्मही वेगळा होता. पण तरी त्या दोघी एकत्र आल्या आणि एकमेकींच्या पतीचा त्यांनी जीव वाचवला. हिंदू आणि मुस्लिम महिला ज्या दोघींचेही पती मृत्यूच्या दारात होते. पण त्यांनी आपल्या पतीऐवजी एकमेकींच्या पतीला वाचवलं आहे. यामागील कारणही कौतुकास्पद आहे.

दिल्लीतील फोर्टिस रुग्णालयातील हे प्रकरण. इथं दोन पुरुष रुग्ण होते. मोहम्मद सुल्तान डार आणि विजय कुमार अशी त्यांची नावं. 62 वर्षांचे सुल्तान जम्मू-काश्मीरमधील एका टेलिफोन विभागात काम करतात. तर यूपीत राहणारे 58 वर्षांचे विजय कुमार माजी सैनिक आहेत. या दोघांनीही असा आजार झाला की त्यांना किडनीची समस्या झाली. गेल्या कित्येक महिन्यांपासून दोघंही डायलिसिसवर होते. अखेर किडनी प्रत्यारोपण करण्याची वेळ त्यांच्यावर आली. OMG! 101 म्हाताऱ्यांनी असं काही केलं की संपूर्ण जगाची हवा टाईट; पाहा थरारक VIDEO पण दोघांनाही किडनी दाता मिळत नव्हता. जे मिळाले ते पात्र नव्हते. अखेर हिंदू-मुस्लिम या दोन्ही कुटुंबांनी एकमेकांची मदत करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या पत्नीने एकमेकींच्या पतीचा जीव वाचवायचं ठरवलं. सुल्तान यांच्या पत्नीने विजय यांना तर विजय यांच्या पत्नीने सुल्तान यांना आपली एक किडनी दिली. आज तकच्या वृत्ता नुसार रुग्णालयातील नेफ्रॉलॉजी अँड किडनी ट्रान्सप्लांटचे प्रमुख डॉ. संजीव गुलाटी यांनी सांगितलं की, दोन्ही प्रकरणात रुग्ण आणि डोनरचा रक्तगट जुळत नव्हता. त्यामुळे किडनी अदलाबदली करणं हा एकच मार्ग होता. भारतात किडनी स्वॅपची दुर्मिळ प्रकरणं आहेत. 2 नवऱ्यांसोबत आनंदात राहते महिला, म्हणाली ‘डिप्रेशनमध्ये जायलाही वेळ नाही’ 16 मार्चला दोघांवरही किडनी ट्रान्सप्लांट झालं. २७ मार्चला त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. उत्तर प्रदेश आणि जम्मू-काश्मीर या दोन राज्यांतील दोन वेगवेगळ्या धर्माचे दोन कुटुंब अनोख्या पद्धतीने एकमेकांशी जोडले गेले आहेत

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या