कोलकाता 16 जुलै : सापाचं नाव ऐकलं तरीही अनेकांचा भीतीनं थरकाप उडतो. अशात जर घरातच साप निघाले तर? विचार करूनच अंगावर काटा येतो. मात्र, अशी एक घटना आता समोर आली आहे. यात एका घरात एक-दोन नव्हे तर तब्बल 17 विषारी साप आढळून आले (17 Poisonous Snake in Kitchen) आहेत. काळ्या रंगाची ही सापाची पिल्लं पश्चिम बंगालमधील (West Bengal) अलीपुरद्वार जिल्ह्यातील एका घरातील किचनमध्ये आढळली आहेत. किचनमधील एका बिळात हे साप पाहून घरातील सदस्यांची घाबरगुंडी उडाली. किचनमध्ये असलेल्या या सापांना सर्वात आधी तिथे जेवण बनवत असलेल्या महिलेनं पाहिलं. मोठ्या संख्येनं विषारी साप दिसताच महिलेनं बाहेर धाव घेतली. ही घटना अलीपुरद्वार जिल्ह्यातील कुमारग्राम ब्लॉकच्या खोवादंगा गावातील आहे. या घटनेनंतर संपूर्ण गावात खळबळ उडाली. स्विमिंग पुलमध्ये उतरलेल्या महिलेसोबत घडलं भलतंच; VIDEO पाहून पोट धरून हसाल महिला किचनमध्ये जेवण बनवण्यासाठी गेली होती. तिनं गॅसवर एका भांड्यात तांदूळ ठेवले. यानंतर एक-एक करून जवळच्याच बिळातून साप बाहेर येऊ लागले. घरात राहणाऱ्या सुबीर बाबूनं सांगितलं, की काहीच वेळात किचनमध्ये सगळीकडे साप दिसू लागले. यानंतर कुटुंबीयांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली आणि लोकांना बोलावलं. यानंतर शेजारच्याच बाजारात असणारे काही लोक त्यांच्या घरी आले. सर्पमित्रांना याबाबत माहिती देण्यात आली. ही बातमी पसरताच आणखी दोन जण याठिकाणी आले आणि त्यांनी सापांनी किचनमधून बाहेर काढण्याचं काम सुरू केलं. त्यांनी सर्वात आधी किचनमधील आठ सापांना वाचवलं आणि यानंतर त्यांनी या बिळाजवळ खोदकाम करण्यास सुरुवात केली. यानंतर आणखी पाच सापांना वाचण्यात आलं. यानंतर पाणी टाकताच आणखी चार साप बाहेर आले. बाईक चालवण्याची हौस तरुणीला पडली भारी! स्कूटी सोडून थेट बुलेटवरच बसली आणि… सापांना वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या रोहित कर आणि मानवेंद्र यांनी सांगितलं, की हे साप केवळ दोन दिवसांचे होते. उष्णतेमुळे ते बाहेर आले. सर्व साप लहान आहेत मात्र भरपूर विषारी आहेत. सापांना वाचवून त्यांना सुरक्षित स्थळी सोडण्यात आलं आहे.