16 महिन्यांच्या बाळाचा मृत्यू
नवी दिल्ली 27 जून : असं म्हणतात की आई आपल्या मुलांसाठी काहीही करायला तयार असते. वेळ आली तर ती आपल्या जीवाचीही पर्वा न करता आपल्या मुलांचं रक्षण करते. आईला जगात देवाचा दर्जा दिला जातो. तिच्या रागातही प्रेम आहे, असं म्हटलं जातं. तुम्ही तिच्याशी कितीही भांडले तरी ती आपल्या मुलांची साथ सोडत नाही. आई आणि मुलाचं प्रेम आणि काळजी याविषयी अनेक हृदयस्पर्शी बातम्या समोर येतात. मात्र, आज आम्ही तुम्हाला ज्या प्रकरणाबद्दल सांगणार आहोत ते हृदय पिळवटून टाकणारं आहे. आपण कल्पनाही करू शकत नाही की एखादी आई इतकी क्रूर असू शकते. एका महिलेनं आपल्या 16 महिन्यांच्या मुलीला घरी एकटं सोडलं आणि स्वतः सुट्टीवर गेली, चला जाणून घेऊया काय आहे हे प्रकरण. एका मुलीचा मृत्यू झाल्याचं स्थानिक लोकांनी क्लीव्हलँड पोलीस अधिकाऱ्यांना सांगितलं. त्यांनी हा संपूर्ण प्रकार सांगितल्यावर अधिकारीही अवाक झाले. यानंतर पोलीस जेलीनच्या घरी पोहोचले तेव्हा त्यांना मुलगी मृतावस्थेत आढळली. गोळी झाडून 7 तास वेदिकाला कारमध्ये फिरवत होता भाजप नेता, त्यानंतर ओलांडली क्रूरतेची सीमा पोलिसांनी सांगितलं की, जेव्हा ते घरी पोहोचले तेव्हा मुलगी एका घाणेरड्या ब्लँकेटवर पडली होती. ब्लँकेटवर लघवीचे आणि घाणीचे डाग होते. या प्रकरणी पोलिसांनी आई क्रिस्टेल कॅंडेलिओविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून तिला अटक केली आहे. शेजारी सुलेम गोंजालेज यांनी सांगितलं, की क्रिस्टेल हिने कधीही तिच्या मुलीची काळजी घेतली नाही. फक्त तिची आजी तिला पाहत असे आणि तिला खायला देत असे. जेव्हा कधी क्रिस्टलला कुठेतरी बाहेरगावी जायचं असायचं तेव्हा ती तिला तिच्या आजीकडे आणि इतर लोकांकडे सोडायची. परंतु त्या दिवशी तिने आपल्या मुलीला आजीकडेदेखील पाठवलं नाही. क्लीव्हलँडमधील अशा प्रकारची ही दुसरी घटना आहे, ज्यात आईने आपल्या मुलीची हत्या केल्याचा आरोप लावण्यात आला आहे.