JOIN US
मराठी बातम्या / Viral / लेकीने रडणाऱ्या बाळाला शांत केलं अन् आजी-आजोबांना झाली अटक; नेमकं प्रकरण काय?

लेकीने रडणाऱ्या बाळाला शांत केलं अन् आजी-आजोबांना झाली अटक; नेमकं प्रकरण काय?

आईची रडणाऱ्या बाळाला शांत करण्याची पद्धत पाहून पोलीस, कोर्टही हादरले.

जाहिरात

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

लंडन, 13 मे :  बाळ म्हणजे ते रडतंच. त्याला शांत करण्यासाठी पालक काय काय नाही केलं जात. अशाच एका आईने आपल्या रडणाऱ्या बाळाला शांत केलं. पण त्यानंतर बाळाच्या आजी-आजोबांना अटक झाली आहे. हे प्रकरण पाहून पोलीस आणि कोर्टही हादरलं आहे. कारण आईने रडणाऱ्या बाळाला ज्या पद्धतीने शांत केलं ती पद्धत वाचूनच तुमच्या अंगावर काटा येईल. लहान मुलं बऱ्याच चुका करतात. पण त्या नकळत झालेल्या चुका असतात आणि या चुका इतक्याही मोठ्या नसतात की त्याची त्यांना भयानक शिक्षा दिली जाईल. पण सध्या एक असं प्रकरण समोर आलं आहे, ज्यात अवघ्या वर्षांच्या मुलीने असा कांड केला आहे की तिच्या आईबाबांनाही अटक करण्यात आली आहे. हे प्रकरण पाहिल्यानंतर पोलीस आणि कोर्टही हादरलं आहे.

ब्रिटनमधील ही घटना आहे. पॅरिस मेयो असं या आईचं नाव आहे. अवघ्या 15 व्या वर्षात ती आई झाली. 2019 साली तिने एका मुलाला जन्म दिला. सामान्यपणे बाळाचा जन्म होताच ते रडू लागतं. पॅरिसचं बाळही रडू लागलं. तिने सुरुवातीला रडणाऱ्या बाळाला शांत करण्याचा प्रयत्न केला. पण ते काही शांत होईना. त्यामुळे तिला इतका राग आला की तिने भयंकर कांड केलं. यानंतर तिच्या आईवडिलांनाही अटक करण्यात आली आणि त्यांची चौकशी करण्यात आली. -20 डिग्री तापमान, भूक लागताच खायचा बर्फ; बेपत्ता 8 वर्षीय मुलगा अशा अवस्थेत सापडला की… मुलीला कोर्टात हजर करण्यात आलं. तपास यंत्रणांनी कोर्टात सांगितलं की, मेयो 15 वर्षांची असताना अचानक प्रेग्नंट झाली. तिच्या म्हणण्यानुसार, ती गर्भवती कशी झाली हे तिला माहीत नाही. ही गोष्ट तिने तित्या घरच्यांपासूनही लपवून ठेवली होती. 2019 मध्ये एका रात्री 9.30 वाजता तिने एका मुलाला जन्म दिला. त्यावेळी मुलाचं वजन 3.56 किलो होते. जन्म होताच तो रडू लागला. आधी मेयोनं त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला, पण तो गप्प बसला नाही तेव्हा तिने त्याची मान वळवली. गळा आवळून खून केला. मुलाच्या तोंडातून रक्त येऊ लागल्यावर मेयोने रक्त लपवण्यासाठी त्याच्या गळ्यात कापूस घातला. एक-दोनदा नाही तर पाच वेळा गळ्यात कापूस घातला जेणेकरून रक्तस्त्राव थांबेल. मुलाच्या गळ्यात कापसाचे पाच गोळे सापडल्याचे डॉक्टरांनी न्यायाधीशांना सांगितलं तेव्हा त्यांनाही धक्का बसला. त्याच्या डोक्याच्या मागच्या बाजूला मार लागला होता. मेयोने त्याला पायाने चिरडण्याचा प्रयत्न केला. तपास यंत्रणांना सहकार्य करणाऱ्या बालरोगतज्ज्ञांनी सांगितलं की, पुराव्यांनुसार बाळाची जन्मानंतर दोन तासांनी हत्या करण्यात आली. हे काय? 6 वर्षांच्या विद्यार्थ्याचं ड्रॉईंग पाहून शिक्षकांना फुटला घाम, बोलावली एमर्जन्सी मीटिंग दरम्यान लेकीने बाळासोबत केलेल्या या भयानक कृत्यानंतर पोलिसांनी तिच्या पालकांनाही अटक केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या