JOIN US
मराठी बातम्या / Viral / अबब! नाकातून निघाला दगड; 1 तास चालली शस्त्रक्रिया, डॉक्टरही हादरले

अबब! नाकातून निघाला दगड; 1 तास चालली शस्त्रक्रिया, डॉक्टरही हादरले

महिलेला श्वास घेण्यास प्रचंड त्रास व्हायचा, शिवाय दुर्गंधही तिला सहन होत नव्हता. त्यामुळे तिने 10 वर्ष हा दगड नाकात बाळगल्यानंतर अखेर असह्य झाल्यावर डॉक्टरांशी संपर्क साधला.

जाहिरात

दगड आणखी काही काळ नाकात राहिला असता तर तिच्या जीवाला धोका होता, असं डॉक्टरांनी सांगितलं.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

सुनील रजक, प्रतिनिधी शिवपुरी, 12 जून : तुम्हाला श्वास घायला त्रास होत असेल किंवा नाकात काहीतरी अडकल्यासारखं वाटत असेल, तर त्वरित डॉक्टरांकडे जा. नाहीतर ते तुमच्या जीवावरही बेतू शकतं. एका महिलेच्या नाकातून तब्बल 25 ग्रॅमचा दगड निघाला आहे. जवळजवळ 1 तास 12 मिनिटांची झुंज देऊन डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून तो बाहेर काढला. आता महिला पूर्णपणे बरी आहे, परंतु दगड आणखी काही काळ नाकात राहिला असता तर तिच्या जीवाला धोका होता, असं डॉक्टरांनी सांगितलं. मध्यप्रदेशच्या शिवपुरी जिल्ह्यात ही घटना घडली. शिवपुरीत वैद्यकीय महाविद्यालयाच्या ईएनटी म्हणजेच कान, नाक, घसा विभागात पहिल्यांदाच अशाप्रकारची शस्त्रक्रिया पार पडली. 10 वर्षांपासून या महिलेच्या नाकात घाण साचली होती. या घाणीचे खडे झाले. त्यामुळे महिलेला श्वास घेण्यास प्रचंड त्रास व्हायचा, शिवाय दुर्गंधही तिला सहन होत नव्हता. त्यामुळे तिने 10 वर्ष हा दगड नाकात बाळगल्यानंतर अखेर असह्य झाल्यावर डॉक्टरांशी संपर्क साधला.

वैद्यकीय महाविद्यालयाच्या ईएनटी विभागात उपप्राध्यापिका म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. मेघा प्रभाकर यांनी सांगितलं, ‘धोलागडच्या रहिवासी असलेल्या 36 वर्षीय सत्यवती गोस्वामी यांना 10 वर्षांपासून श्वसनाचा त्रास होत होता. साधारणतः नाकातली घाण मऊ असते परंतु त्यांचा नाक तपासला असता त्यात दिसणारी घाण दगडासारखी कडक दिसत होती. ही घाण साफ करताना रक्तस्राव होऊ लागला. मग महिलेला बेशुद्ध करून 1 तास 12 मिनिटे चाललेल्या शास्त्रक्रियेनंतर 25 ग्रॅमचा दगड त्यांच्या नाकातून बाहेर काढण्यात आला.’ Shivsena : ‘मुख्यमंत्री शिंदेंच्या टीममधील 4 मंत्र्यांना नारळ मिळणार’, मोठा गौप्यस्फोट दरम्यान, हा दगड आणखी काही दिवस तसाच राहिला असता तर या महिलेच्या जीवाला धोका होता. परंतु आता तिचं नाक पूर्णपणे स्वच्छ झालं असून तीदेखील शुद्धीत आली आहे. तसेच ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून आता महिलेच्या जीवाला कोणताही धोका नाही, असं डॉक्टरांनी सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या