JOIN US
मराठी बातम्या / Viral / एका दुचाकीवर 10 जण करत होते प्रवास; अचानक पुढचं चाक हवेत उचललं अन्..., पाहा VIDEO

एका दुचाकीवर 10 जण करत होते प्रवास; अचानक पुढचं चाक हवेत उचललं अन्..., पाहा VIDEO

रस्त्यावरून वाहने ये-जा करत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसतं. त्यातच एका दुचाकीस्वाराने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे, कारण त्याच्या बाईकवर 10 जण बसलेले आहेत

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 11 जून : सैन्याची परेड तुम्ही पाहिलीच असेल, ज्यामध्ये भारतीय सैनिक बाइकवर विविध पराक्रम करून दाखवतात. अनेक वेळा एकाच दुचाकीवर अनेक तरुण बसल्याचं दिसून येतं. हे दृश्य अतिशय उत्तेजित आणि सर्वांना आश्चर्यचकित करणारं असतं. देशात असे अनेक लोक आहेत, जे लष्कराच्या जवानांसारखे स्टंट करण्याचा प्रयत्न करतात. कधीकधी ते यात यशस्वीही होतात. मात्र कधीकधी हे स्टंट त्यांना चांगलेच महागात पडतात. काळ आला होता पण…; रस्त्यावर उभा असतानाच अंगावर आली भरधाव ट्रक, VIDEO चा शेवट थक्क करणारा अशा प्रकारचे स्टंट करणं लहान मुलांचा खेळ नसून हे सर्व करण्यासाठी अतिशय सराव आणि मेहनतीची गरज असते. सध्या सोशल मीडियावर अशाच एका स्टंटचा व्हिडिओ व्हायरल (Bike Stunt Viral Video) होत आहे. हा व्हिडिओ पाहून कोणीही हैराण होईल. कारण या व्हिडिओमध्ये एका दुचाकी २-४ नाही तर तब्बल १० जण प्रवास करताना दिसतात.

संबंधित बातम्या

रस्त्यावरून वाहने ये-जा करत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसतं. त्यातच एका दुचाकीस्वाराने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे, कारण त्याच्या बाईकवर 10 जण बसलेले आहेत. त्यातही बाईक चालवणारी व्यक्ती हा स्टंट आणखी धोकादायक बनवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. अनेकांना बसवून तो दुचाकीचे पुढचे चाक उचलण्याचा प्रयत्न करतो. मात्र, जास्त लोक दुचाकीवर असल्याने त्याला हे चाक जास्त वरती उचलता येत नाही. हा स्टंट पाहून तुमच्या अंगावरही काटा येईल. स्विमिंग पुलमध्ये स्टंट करताना भयंकर दुर्घटना; तोल जाताच डोक्यावर पडला, धक्कादायक VIDEO हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर ba.ljeet7175 या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत 2 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तर 10 हजारांहून अधिक लोकांनी व्हिडिओ लाईक देखील केला आहे. त्याचबरोबर हा व्हिडिओ पाहून लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका वापरकर्त्याने याचं वर्णन ‘धोकादायक स्टंट’ असं केलं आहे तर दुसर्‍याने ‘हेवी ड्रायव्हर’ अशी कमेंट केली आहे. आणखी एका युजरने कमेंट करत लिहिलं की, ‘ट्रस्ट लेव्हल असावी तर अशी, अन्यथा असूच नये’.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या