मुंबई, 30 सप्टेंबर : बॉलिवूड गाण्यांची क्रेझ फक्त भारतापुरतीच मर्यादित नाही. बॉलिवूड सिनेमांचे चाहते जगभरात पसरलेले आहेत. एवढंच नाही तर आता अमेरिकन दूतावासातही बॉलिवूडच्या गाण्यांची क्रेझ पाहायला मिळाली. अमेरिकन दूतावासाच्या ऑफिशिअयल ट्विटर पेजवर नुकताच एक व्हिडीओ शेअर करण्यात आला. जो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये अमेरिकन दूतावासाचे कर्मचारी बॉलिवूडची गाणी गाताना दिसत आहेत. बॉलिवूडच्या ‘शोले’ सिनेमातील ‘ये दोस्ती…’ हे गाणं गात आहेत. याशिवाय इतर अनेक बॉलिवूडची गाणी त्यांनी गायली आहेत.
पंतप्रधान मोदींच्या अमेरिका भेटीनंतर हे गाणं मोदी आणि ट्रम्प यांच्या दोस्तीसाठी तर नाही ना असा सूर सोशल मीडियावर पाहायला मिळात आहेत. या व्हिडीओवर भारतीयांच्या मात्र फार मजेशीर प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.
बॉलिवूडची क्रेझ परदेशात पोहोचली असली तरीही हा व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हाही पोट धरुन हसल्याशिवाय राहणार नाही. या व्हिडीओमधील त्यांचे हावभाव आणि गाण्यांचे उच्चार ऐकल्यावर कोणलाच हसू आवरणार नाही. ===================================================== VIDEO : अखेर आदित्य ठाकरेंनीच केली निवडणूक लढवण्याबद्दल घोषणा, म्हणाले…