JOIN US
मराठी बातम्या / विदेश / Afghanistan Crisis: अमेरिकेनं ISISवर केलेल्या ड्रोन हल्ल्यात 3 निष्पाप चिमुकल्यांचा बळी

Afghanistan Crisis: अमेरिकेनं ISISवर केलेल्या ड्रोन हल्ल्यात 3 निष्पाप चिमुकल्यांचा बळी

इस्लामिक स्टेट (ISIS) या दहशतवादी संघटनेनं काबूल विमानतळावर विस्फोट (Blast at Kabul Airport)घडवून अनेकांचे बळी घेतले आहेत. यानंतर आता अमेरिकेनंही (United States) इसिसच्या ठिकाणाला लक्ष्य केलं आहे.

जाहिरात

रविवारी अमेरिकेनं इसिसच्या दहशतवादी अड्ड्यावर ड्रोननं हल्ला केला आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

काबूल, 30 ऑगस्ट: तालिबाननं अफगाणिस्तानात ताबा मिळवल्यानंतर देशात अनागोंदी माजली आहे. दरम्यान इस्लामिक स्टेट (ISIS) या दहशतवादी संघटनेनं काबूल विमानतळावर विस्फोट (Blast at Kabul Airport)घडवून अनेकांचे बळी घेतले आहेत. यानंतर आता अमेरिकेनंही (United States) इसिसच्या ठिकाणाला लक्ष्य केलं आहे.  रविवारी अमेरिकेनं इसिसच्या दहशतवादी अड्ड्यावर ड्रोननं (Drone Attack at ISIS) हल्ला केला आहे. वृत्तसंस्था असोसिएटेड प्रेसनुसार, अमेरिकेच्या मते संबंधित इसिसचा दहशतवादी कारनं काबूल विमानतळावर हल्ला करण्याच्या बेतात होता. पण या हल्ल्यात तीन निष्पाप मुलांचाही जीव गेल्याची माहिती एका अफगाण अधिकाऱ्यानं दिली आहे. अमेरिकन ड्रोन हल्ल्यात एक कारला लक्ष्य केल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यानं दिली आहे. ज्यामध्ये अनेक आत्मघातकी हल्लेखोर असल्याची चर्चा आहे. हे हल्लेखोर काबूल विमानतळावर हल्ला करणार होते असंही सांगण्यात येत आहे. अमेरिकेनं इसिसवर केलेला हा दुसरा हवाई हल्ला आहे. यापूर्वी गुरुवारी इसिसनं काबूल विमानतळावर हल्ला करून 13 अमेरिकन सैनिकांसह अनेक अफगाण नागरिकांना निर्दयीपणे हत्या घडवून आणली होती. हेही वाचा- पुन्हा हादरलं काबुल! एअरपोर्टजवळ रॉकेट हल्ला, दोघांचा मृत्यू, तीन जखमी इस्लामिक स्टेटनं काबूल विमानतळ परिसरात केलेल्या आत्मघाती हल्ल्यानंतर तालिबाननं विमानतळाभोवती सुरक्षा वाढवली आहे. संबंधित आत्मघाती हल्ल्यात 180 हून अधिक लोकं मारले आहेत. यानंतर ब्रिटननं शनिवारी आपली बचाव मोहिमेतील शेवटची उड्डाणं घेतली आहेत. तर दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी अमेरिकेच्या सर्व नागरिकांना आणि सैन्यांना  युद्धभूमीतून मंगळवारपर्यंत मायदेशी परतण्याचे आदेश दिले आहेत. हेही वाचा- कंदाहारमधील TV आणि RADIO वरील संगीत बंद, महिलांना घरचा रस्ता लष्कराचे प्रवक्ते आणि यूएस नौदलाचे कॅप्टन बिल अर्बन यांनी सांगितलं की,  संबंधित ड्रोन हल्ला स्वसंरक्षणासाठी करण्यात आला होता. मात्र, या हल्ल्यात काही नागरिकांचा मृत्यू झाला की नाही याबाबत लष्कराकडून तपास केला जात आहे. पण संबंधित हल्ल्यात नागरिकांचा मृत्यू झाल्याचा कोणताही पुरावा अद्याप समोर आला नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या