JOIN US
मराठी बातम्या / विदेश / अफगाणिस्तानातील महिला शिक्षण घेऊ शकणार का? तालिबानचा अजब फतवा

अफगाणिस्तानातील महिला शिक्षण घेऊ शकणार का? तालिबानचा अजब फतवा

1990 च्या राजवटीत तालिबान मुलींच्या शिक्षणाच्या पूर्णपणे विरोधात होतं. परंतु यावेळी अफगाणिस्तानमध्ये सत्ता मिळवल्यापासून तालिबान सतत आपल्यातील बदलाबद्दल बोलत आहे

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

काबूल 30 ऑगस्ट : अफगाणिस्तानवर तालिबाननं कब्जा (Taliban Regains Control of Afghanistan) केल्यानंतर आता महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या अनेक घटना (Afghanistan Crisis) समोर येऊ लागल्या आहेत. मात्र, तालिबानी सतत असा दावा करत आहे, की ते इथल्या लोकांचं आयुष्य अगदी चांगलं बनवणार आहेत. याचदरम्यान, तालिबानच्या कार्यवाहक उच्च शिक्षणमंत्र्यांनी महिलांबाबत मोठी घोषणा केली आहे. अब्दुल बाकी हक्कानी यांनी म्हटलं आहे, की तालिबानच्या राजवटीत मुली विद्यापीठात शिकू शकतील (Women’s Education in Afghanistan). मात्र, या काळात मुला -मुलींचे वर्ग एकत्र चालणार नाहीत 1990 च्या राजवटीत तालिबान मुलींच्या शिक्षणाच्या पूर्णपणे विरोधात होतं. परंतु यावेळी अफगाणिस्तानमध्ये सत्ता मिळवल्यापासून तालिबान सतत आपल्यातील बदलाबद्दल बोलत आहे. त्याच अनुक्रमात तालिबान सरकारमधील कार्यवाहक उच्च शिक्षण मंत्री अब्दुल हक्कानी यांनी मुलींच्या शिक्षणाविषयी बोलले आहे. ते म्हणाले की, अफगाणिस्तानचे लोक शरिया कायद्यानुसार उच्च शिक्षण घेऊ शकतील. परंतु या काळात मुलं आणि मुलींचे वर्ग स्वतंत्रपणे चालतील. VIDEO: लोकांना माणुसकीचा पडला विसर! तरुणाला भररस्त्यात पट्ट्याने मारहाण हक्कानी म्हणाले की, तालिबानला इस्लामिक अभ्यासक्रम तयार करायचा आहे. हा अशाप्रकारे तयार केला जाईल जो आपल्या इस्लामिक, राष्ट्रवादी आणि ऐतिहासिक मूल्यांनुसार असेल. त्याचबरोबर इतर देशांशी स्पर्धा करण्यासही सज्ज असेल. यादरम्यान त्यांनी अफगाणिस्तानातील महिलांच्या हक्कांचे संरक्षण करण्याचा दावा केला आहे. ते म्हणाले, की महिलांना काम करू शकतात तसंच अभ्यासही करू शकतील. Schools Reopening: शाळा सुरु करा, पण ही काळजी घ्या! एम्सच्या डॉक्टरांचा सल्ला यापूर्वी तालिबानने अफगाणिस्तानमध्ये राहणाऱ्या महिलांसाठी 10 नियम केले होते. यामध्ये फिंटिंगचे कपडे घालणे, बुरखा न घालता घराबाहेर पडणे, उंच टाचांचे सॅन्डल घालणे, नेल पेंट लावणे आणि सार्वजनिक मेळाव्यात भाग घेणं यावर बंदी होती. तालिबानने आपल्या आदेशात म्हटलं होतं की, जर कोणी महिलांसाठी बनवलेले नियम मोडले तर त्याला क्रूर शिक्षा भोगावी लागेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या