JOIN US
मराठी बातम्या / विदेश / बसची वाट पाहात असलेल्या प्रवाशांना भरधाव कारनं चिरडलं, 7 जणांचा जागीच मृत्यू

बसची वाट पाहात असलेल्या प्रवाशांना भरधाव कारनं चिरडलं, 7 जणांचा जागीच मृत्यू

बस स्टॉपवर बसायला बेंच नव्हता, बसची वाट पाहात लोक उभी होती. बस येण्याच्या वाटेकडे सगळ्यांचे डोळे होते. लवकर चढायला मिळावं म्हणून प्रवाशांनी एकाच ठिकाणी घोळका केला होता. अचाकन आलेल्या SUV कारने या लोकांना चिरडलं.

जाहिरात

texas

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

टेक्सास : बसची वाट पाहात स्टॉपवर प्रवासी उभे होते. मात्र त्यांना याची जराही कल्पना नव्हती की बसऐवजी आपला मृत्यूच आपल्या समोर येऊन उभा ठाकेल. बसची वाट पाहाच उभ्या असेलेल्या प्रवाशांना भरधाव कारनं चिरडलं आहे. या भीषण दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी आहेत. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमी व्यक्तींना उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल केलं आहे. ब्राउन्सविले पोलीस अधिकारी मार्टिन सँडोव्हल यांनी दिलेल्या माहितीनुसार हा अपघात यूएस वेळेनुसार सकाळी 8.30 च्या सुमारास झाला.

भरधाव कार विजेच्या खांबाला धडकली अन् अडकलेल्या 4 जणांसोबत घडलं भयानक

अपघाताबाबत माहिती मिळाल्यानंतर आम्ही सीसीटीव्ही तपासले, ज्यामध्ये एक एसयूव्ही कार लोकांना चिरडत असल्याचं आम्हाला दिसलं. गाडीचा वेळ यावेळी भयंकर होता. त्यामुळे चालकालाही कारवर नियंत्रण मिळवता येत नव्हतं. नेमकी ही दुर्घटना कशामुळे घडली याबाबत सध्या कोणतीही माहिती मिळू शकली नाही.

त्या बस स्टॉपवर बसायला बेंच नव्हता, बसची वाट पाहात लोक उभी होती. बस येण्याच्या वाटेकडे सगळ्यांचे डोळे होते. लवकर चढायला मिळावं म्हणून प्रवाशांनी एकाच ठिकाणी घोळका केला होता. अचाकन आलेल्या SUV कारने या लोकांना चिरडलं. पोलिसांनी कार चालकाला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू आहे.

Malappuram boat accident: 40 पर्यटकांनी भरलेली बोट उलटली, 21 पर्यटकांनी गमावला जीव

प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार कार चालकाचा ताबा सुटला, त्यामुळे हा अपघात झाल्याचं दिसलं. साधारण 100 फुटांपर्यंत कारने प्रवाशांना धडक मारुन फरफटत नेलं. यामध्ये ७ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या