22 प्रवाशांना घेऊन जाणारं नेपाळचं विमान रडारवरुन Missing, प्रवाशांमध्ये 5 भारतीय
नवी दिल्ली 29 मे: नेपाळहून 22 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या तारा एअरचे (Tara Air) ९ एनएईटी ट्विन-इंजिन असलेले विमान बेपत्ता झाले आहे. यात 5 भारतीय नागरिक ( Indian Missing in Nepal ), 13 नेपाळी प्रवाशी यांचाही समावेश होता. याचबरोबर पोखरा ते जोमसोमला येथे जाणाऱ्या नेपाळी दलातील लष्करी अधिकारी होते. गेल्या 2 तासापासून या विमानाचा विमातळाशी संपर्क तुटल्याची माहिती विमानतळ अधिकाऱ्यांनी दिली होती. एएनआयच्या वृत्तानुसार तारा एयरच्या या विमानाने आज सकाळी 9 वाजून 55 मिनिटांनी उड्डाण घेतले होते. विमानाचा शोध घेण्यासाठी एक खासगी विमानही पाठवण्यात आल्याचे नेपाळी दलाच्या प्रवकत्याने सांगितले. हेही वाचा - पंढरपुरच्या वारीबाबत पंतप्रधान मोदींचं महत्त्वाचं वक्तव्य; ‘मन की बात’मध्ये म्हणाले… तपासासाठी खासगी हेलिकॉप्टर रवाना नेपाळ लष्कराचे प्रवक्ते नारायण सिलवाल यांनी सांगितले की, “नेपाळी लष्कराचे एमआय-17 हेलिकॉप्टर तारा एयरच्या विमानाचा शोध घेण्यासाठी लेटे, मुस्तांग येथून रवाना झाले आहे. या फ्लाइटमध्ये कॅप्टन प्रभाकर घिमिरे, फ्लाइट अटेंडंट किस्मी थापा आणि अन्य क्रू मेंबर उत्सव पोखरेल हे तीन क्रू सदस्य होते.
भारतीय दूतावासाने जारी केला हेल्पलाईन क्रमांक काठमांडू येथील भारतीय दूतावासाने बेपत्ता विमानाबाबत संपर्कासाठी +977-9851107021 हा आपत्कालीन क्रमांक जारी केला आहे. हेही वाचा - मोठी बातमी! अमरनाथ यात्रेवर दहशतवादी हल्ल्याचं सावट? ड्रोनमध्ये सापडले बॉम्ब