मुंबई, 21 जून : आज चौथा आंतरराष्ट्रीय योग दिन आहे. या दिनानिमित्त देशभरात योग उपक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडची राजधानी डेहराडूनमधून योगदिन साजरा केला आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुबईत योगदिन साजरा केला आहे.
मुंबईमध्ये योग दिनानिमित्त आशिष शेलार यांनी योग शिबिर आयोजित केलं आहे. या शिबिरात उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार पूनम महाजन, बाबूल सुप्रियो, मुंबईचे पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर आणि मुंबई मनपा आयुक्त अजोय मेहता सहभागी झाले आहेत. आजच्या या दिनानिमित्त पंतप्रधांनी फॉरेस्ट रिसर्च इंस्टीट्यूट (एफआरआई)च्या मैदानातून सगळ्यांना संबोधित केलं. आणि योगा दिनाच्या योगाभ्यासाचे महत्त्व सांगितलं आणि त्यानंतर त्यांनी योग साधना केली.
आज जगातला प्रत्येक देश हा योगसाधना करत आहे. त्याने संपूर्ण विश्वाला ऊर्जा मिळणार आहे. असं मोदी म्हणाले. या आयोजित कार्यक्रमात नरेंद्र मोदी यांनी सगळ्यांमध्ये बसून योगा केला. त्यामुळे योग दिवस हे आता एक आंदोलन झालं आहे. असं मोदी म्हणाले आहेत.