JOIN US
मराठी बातम्या / विदेश / Missing submersible Titanic updates : यापूर्वीही टायटॅनिकच्या अवशेषांना दिली होती भेट; त्या पर्यटकांचा कसा होता अनुभव?

Missing submersible Titanic updates : यापूर्वीही टायटॅनिकच्या अवशेषांना दिली होती भेट; त्या पर्यटकांचा कसा होता अनुभव?

Titan submersible : श्रीमंतांचा साहसी खेळ जिवावर बेतला?

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 23 जून : अटलांटिक महासागरात रविवारी बेपत्ता झालेल्या सिफर्ट टायटन नावाच्या पाणबुडीचे अवशेष सापडले आहेत. या पाणबुडीतून पाच व्यक्ती टायटॅनिक या बुडालेल्या जहाजाचे अवशेष पाहण्यासाठी गेल्या होत्या. अनेक तास कसून शोध घेऊनही पाणबुडीतील व्यक्तींना वाचवण्यात यश आलं नाही. पाणबुडीचे अवशेष मिळाल्यानंतर त्यातील पाचही व्यक्तींना मृत घोषित करण्यात आलं आहे. या पाच व्यक्तींमध्ये ओशनगेट कंपनीचे सीईओ स्टॉकेन रश, ब्रिटिश उद्योगपती हॅमिश हार्डिंग, फ्रेंच डायव्हर पॉल हेन्री नार्गिओलेट, पाकिस्तानी अब्जाधीश प्रिन्स दाऊद आणि त्यांचा मुलगा सुलेमान दाऊद यांचा समावेश आहे. या घटनेनंतर, या पूर्वी टायटॅनिक जहाजाचे अवशेष पाहून सुखरूप परतलेल्या प्रवाशांनी आपले अनुभव शेअर करण्यास सुरुवात केली आहे. नोव्हेंबर 2022मध्ये, सीबीएस संडे मॉर्निंगसाठी असाइनमेंटवर असताना डेव्हिड पोग यांनी टायटॅनिक जहाजाच्या अवशेषांना भेट दिली होती. एनपीआरशी बोलताना त्यांनी टायटन पाणबुडीचं वर्णन ‘आसन नसलेली मिनीव्हॅन’ असं केलं आहे. या प्रवासादरम्यान एखादी चूक झाली तर तुम्ही फार काहीही करू शकत नाही. मात्र, टायटनचे परत येण्याचे अनेक मार्ग आहेत. पाणबुडीतील लाईट गेली किंवा त्यात बसलेल्या व्यक्तींना जीव गमवावा लागला तरी टायटन परत येऊ शकते, असं डेव्हिड पोग यांनी सांगितलं आहे. आपला अनुभव सांगताना डेव्हिड पोग म्हणाले की, हा प्रवास सोपा नव्हता. पाण्यात 37 फूट खोल गेल्यानंतर काहीतरी तांत्रिक अडचण आली. त्यानंतर ही ट्रिप रद्द करण्यात आली. या घडामोडींमुळे डेव्हिड यांना मानसिक धक्का बसला होता. पण, त्यांना या गोष्टीची जाणीव होती की, अशा प्रकारच्या समुद्रसफरी शक्यतो नियोजनाप्रमाणे पार पडत नाहीत. डेव्हिड यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवास सुरू करण्यापूर्वी आठ परिच्छेदांच्या करारावर सही करावी लागते. ‘या प्रवासादरम्यान तुम्ही अपंग होऊ शकता किंवा तुमचा मृत्यू होऊ शकतो’, असा स्पष्ट उल्लेख या करारामध्ये असतो. शिवाय, ओशनगेट ही काही पर्यटन कंपनी नाही. हा प्रवास म्हणजे, श्रीमंत व्यक्तींसाठी हा एक प्रकारचा साहसी खेळ आहे. Titanic Submarin : बेपत्ता पाणबुडीचे झाले तुकडे, 5 जणांचा मृत्यू; रोबोटने शोधले अवशेष, नेमकं काय घडलं? ‘द सिम्पसन्स’चे लेखक माईक रीस आणि त्यांची पत्नी यांनी गेल्या वर्षी टायटॅनिकच्या अवशेषाला भेट दिली होती. KIRO 7 शी बोलताना त्यांनी आपला अनुभव शेअर केला आहे. ते म्हणाले की, टायटॅनिकचे अवशेष पाहून त्यांना विशेष काही वाटलं नाही. तिथपर्यंत पोहोचण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. त्यांच्याकडे फार थोडा वेळ होता. कारण, ते समुद्रसपाटीपासून अडीच मैल खाली होते. शिवाय, त्यावेळी समुद्रात एक वादळही आलं होतं, जे रीस यांच्या पाणबुडीला धडकणार होतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, तिथे जाण्यापूर्वी करारावर सही करताना आपल्याला मृत्यूच्या शक्यतेची पूर्व कल्पना दिलेली असते. जीवघेणी ट्रिप ओशनगेट कंपनीतील गुंतवणूकदार आणि 2021 मध्ये टायटॅनिकच्या दुर्घटनास्थळाला भेट देणारे अॅरॉन न्यूमन यांनी देखील आपला अनुभव सांगितला आहे. त्यांच्या मते, पाणबुडी आरामदायक होती पण तिचा आकार पुरेसा मोठा नव्हता. 5 ते 10 मिनिटांच्या प्रवासानंतर आपण पूर्णपणे अंधारात जातो. पाणबुडीतील लाईटमुळे आपण बाहेर किंवा आतली दृश्ये बघू शकतो. या लाईटशिवाय आपण 100 मीटरपेक्षा जास्त दूर बघू शकत नाही. हा प्रवास म्हणजे डिस्ने राइड नाही. आपण अशा ठिकाणी जात असतो जिथे खूप कमी लोक गेले आहेत. धोक्याची कल्पना असूनही करारावर सही करून तिथे जाण्याचा प्रयत्न केला जातो. दोन वर्षांपूर्वी टायटॅनिकचे अवशेष पाहण्यासाठी गेलेला मेक्सिकन यूट्युबर आणि अभिनेता अॅलन एस्ट्राडानं बीबीसीशी बोलताना सांगितले की, या प्रवासात सहभागी असलेल्या प्रत्येकाला आपण कोणती जोखीम घेत आहोत याची जाणीव असते. मीसुद्धा गेलो होतो तेव्हा मला माहीत होतं की जर काही वाईट घडलं किंवा खोल गेल्यावर पाणबुडी खराब झाली तर आपले अवशेषही सापडणार नाहीत. अॅलनच्या मते, पाणबुडीचा प्रवास विशेष खास नाही. कार्बन फायबर आणि टायटॅनियमपासून बनवलेल्या पाणबुडीमध्ये फारशी जागा नसते. बुर्ज खलिफाच्या उंचीपेक्षाही साडेचार पट जास्त खोल आहेत हे अवशेष टायटॅनिकचे अवशेष समुद्र सपाटीपासून 12 हजार 500 फूट खोलीवर आहेत. अंदाजानुसार, टायटॅनिकचे अवशेष असलेल्या जागेची खोली जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफाच्या उंचीपेक्षा साडेचार पट जास्त आहे. सूर्यप्रकाशदेखील समुद्राच्या पाण्यात फक्त 660 फुटांपर्यंत जाऊ शकतो. स्कुबा डायव्हिंगसाठी, लोक फक्त 130 फूट खोलीवर जातात. समुद्रात आतापर्यंतचं सर्वांत खोल अंडर वॉटर रेस्क्यू ऑपरेशन 1 हजार 575 फूट खोलीवर करण्यात आलेलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या