JOIN US
मराठी बातम्या / विदेश / चार दिवसात ऑपरेशन दोस्तला विसरला तुर्की! UNHRC मध्ये उपस्थित केला काश्मीर मुद्दा, भारताचेही चोख उत्तर

चार दिवसात ऑपरेशन दोस्तला विसरला तुर्की! UNHRC मध्ये उपस्थित केला काश्मीर मुद्दा, भारताचेही चोख उत्तर

India Slams Turkey in UNHRC: तुर्कस्तानच्या अशा आरोपांवर भारतानेही चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

जाहिरात

चार दिवसात ऑपरेशन दोस्तला विसरला तुर्की!

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 4 मार्च : मागच्या महिन्यात तुर्कस्तानमध्ये शक्तीशाली भूकंपाने हाहाकार उडाला. हजारो लोक मृत्यूमुखी पडले. अशावेळी भारताने मदतीचा हात पुढे करत ऑपरेशन दोस्त राबवत मोठं बचावकार्य राबवलं. मात्र, याचा विसर तुर्कीला पडल्याचे पाहायला मिळत आहे. तुर्कस्तानने संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत पुन्हा एकदा पाकिस्तानचे समर्थन करत भारतावर निराधार आरोप केले आहेत. तुर्कस्तानने संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत पाकिस्तानचे समर्थन करताना जम्मू-काश्मीरमध्ये मानवी हक्कांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप केला. तुर्कस्तानच्या अशा आरोपांवर भारतानेही मौन पाळलेले नाही. भारताच्या प्रतिनिधीने यूएनएचआरसीमध्ये तुर्कीला फटकारले आणि म्हटले की तुर्कीने भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये अनावश्यक वक्तव्ये करणे टाळावे. तुर्कस्तानमधील भूकंपानंतर तेथील लोकांच्या मदतीसाठी भारताने ऑपरेशन दोस्त राबवले असतानाही, तुर्कस्तानने UNHRC मध्ये काश्मीर मुद्दा उपस्थित केला आहे. भारताविरुद्धच्या दुर्भावनापूर्ण प्रचाराला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेच्या 52 व्या सत्राच्या उच्चस्तरीय सेगमेंटमध्ये प्रत्युत्तराचा अधिकार वापरला. संयुक्त राष्ट्रसंघातील भारताच्या स्थायी मिशनच्या प्रथम सचिव सीमा पुजानी यांनी पाकिस्तानमधील अहमदिया समुदाय, ख्रिश्चन, हिंदू आणि शीख यांच्यासह धार्मिक अल्पसंख्याकांच्या छळाचा मुद्दा उपस्थित केला. अल्पसंख्याकांना हद्दपार करण्याच्या पाकिस्तानच्या क्रूर धोरणाबद्दल पूजानी यांनी टीका केली. भारताचे ऑपरेशन दोस्त तुर्की आणि सीरियामध्ये झालेल्या भीषण भूकंपामुळे 40 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अजूनही अनेक लोक ढिगाऱ्याखाली दबले गेले आहेत. या संकटाच्या काळात भारत सरकारने तुर्कस्तानला मदतीचा हात पुढे केला. ऑपरेशन दोस्त अंतर्गत भारतातून रेस्क्यू टीम पाठवण्यात आली आहे. भारताकडून तुर्कस्तानला वैद्यकीय मदतही दिली जात आहे. वाचा - हातावर नित्यानंदचा टॅटू, 4 भाषांमध्ये पारंगत, UN मधील कैलासाची सुंदर राजदूत कोण? भारतीय सैन्याने उभारले रुग्णालय भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी भारतीय लष्कराने तुर्कीच्या हेटे शहरात लष्कराचे क्षेत्रीय रुग्णालय देखील उभारले आहे. भूकंपात जखमी झालेल्या लोकांवर येथे उपचार सुरू आहेत. त्याचवेळी, परराष्ट्र राज्यमंत्र्यांनी असेही सांगितले की, भारत तुर्कस्तानच्या लोकांना शक्य ती सर्व मदत करण्यास तयार आहे.

तुर्कस्तानमध्ये झालेल्या भूकंपात 8500 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 49000 हून अधिक लोक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) बुधवारी सांगितले की सध्या तुर्कीमध्ये सुमारे 3,000 भारतीय आहेत. बंगळुरू येथील एक व्यापारी गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता आहे. मंत्रालयाने असेही सांगितले की 850 लोक इस्तंबूलच्या आसपास आहेत, 250 अंकारामध्ये आहेत आणि उर्वरित देशभरात पसरलेले आहेत. 10 भारतीय नागरिक तुर्कस्तानच्या दुर्गम भागात अडकले आहेत. मात्र, सुरक्षित आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या