JOIN US
मराठी बातम्या / विदेश / तुर्कीनंतर आणखी एक देश शक्तीशाली भूकंपाने हादरला, सलग दुसरे अस्मानी संकट

तुर्कीनंतर आणखी एक देश शक्तीशाली भूकंपाने हादरला, सलग दुसरे अस्मानी संकट

चक्रीवादळाच्या संकटाशी सामना करणाऱ्या न्यूझीलंडवर आणखी एक अस्मानी संकट कोसळले आहे.

जाहिरात

चक्रीवादळाच्या संकटाशी सामना करणाऱ्या न्यूझीलंडवर आणखी एक अस्मानी संकट कोसळले आहे.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

वेलिंग्टन, 15 फेब्रुवारी : चक्रीवादळाच्या संकटाशी सामना करणाऱ्या न्यूझीलंडवर आणखी एक अस्मानी संकट कोसळले आहे. न्यूझीलंडला 6.1 तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला आहे. या भूकंपाच्या धक्क्यामुळे अद्याप कुठेही जीवितहानीचे वृत्त नाही. युरोपीय-भूमध्य भूकंपीय केंद्र (European-Mediterranean Seismological Centre) ने सांगितले की, बुधवारी संध्याकाळी 7 वाजून 38 मिनिटाने न्यूझीलंडमधील लोअर हटपासून 78 किमी उत्तर पश्चिम परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले, रिक्टर स्केलवर 6.1 तीव्रतेची नोंद झाली आहे. भूकंपाचे केंद्र बिंदू हे 48 किमी खोल अंतरावर असल्याचे सांगितले जात आहे. याचे केंद्र हे पारापरामू शहरापासून 50 किमी अंतरावर आहे. (Canada Ram Mandir Defaced : कॅनडात राम मंदिराची विटंबना, भिंतीवर लिहिल्या भारत आणि मोदी विरोधी घोषणा) आधीच न्यूझीलंडला गेब्रियल चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे. त्यामुळे जनजीवन हे विस्कळीत झाले आहे. चक्रीवादळामुळे समुद्र किनाऱ्यावरील अनेक बेटांचे मोठे नुकसान झाले आहे. या आधी असे कोणतेच संकट न्यूझीलंडवर आले नव्हते. (ताप, नाकातून रक्त आणि नंतर मृत्यू, या देशात अज्ञात आजाराने खळबळ) न्यूझीलंडमध्ये आपात्कालीन परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. आतार्यंत न्यूझीलंडमध्ये फक्त 3 वेळाच आपात्कालीन परिस्थिती जाहीर करण्याची वेळ आली आहे. या चक्रीवादळामुळे 16 लाख लोक प्रभावित झाले आहे. आतापर्यंत 3 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या