मराठी बातम्या /बातम्या /विदेश /ताप, नाकातून रक्त आणि नंतर मृत्यू, या देशात अज्ञात आजाराने खळबळ

ताप, नाकातून रक्त आणि नंतर मृत्यू, या देशात अज्ञात आजाराने खळबळ

नव्या आजाराने उडवली संपूर्ण जगाची झोप! २०० हून अधिक लोक क्वारंटाइन

नव्या आजाराने उडवली संपूर्ण जगाची झोप! २०० हून अधिक लोक क्वारंटाइन

नव्या आजाराने उडवली संपूर्ण जगाची झोप! २०० हून अधिक लोक क्वारंटाइन

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

इक्वेटोरियल गिनी : सध्या बदलत्या वातावरणामुळे ताप सर्दी आणि खोकला हा आजार सगळीकडे पसरत आहे. तर दुसरीकडे कोरोनाची भीती अजूनही संपलेली नाही. चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोना वाढत आहे. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आता एका अज्ञात आजाराने खळबळ उडाली आहे. आधी ताप मग नाकातून रक्त येणं आणि नंतर थेट मृत्यू होत असल्याने लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

दक्षिण आफ्रिकेतील इक्वेटोरियल गिनी या भागात एका अज्ञातने धुमाकूळ घातला आहे. या आजारामुळे आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. देशभरात या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. देशाचे आरोग्य मंत्री मितोहा ओंडो ओ अयाकाबा यांनी शुक्रवारी सांगितले की, नमुने तपासण्यासाठी सरकार ठोस पावले उचलत आहे. त्यासाठी रक्ताचे नमुने शेजारील गॅबॉन येथे पाठवण्यात आले आहेत.

तुमच्या होणाऱ्या बाळाचं रंग-रूपही तुम्हाला बदलता येईल; प्रेग्नन्सीची ही नवी पद्धत तुम्हाला माहिती आहे का?

या आजारात रक्तस्त्राव झाल्यामुळे मृत्यू होत आहे. त्यामुळे सध्या या भागांमध्ये भीतीचं वातावरण आहे. प्रशासनाने आतापर्यंत 200 लोकांना सुरक्षेच्या दृष्टीनं क्वारंटाईन केलं आहे. रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार देशाच्या अधिकाऱ्यांनी संसर्गाशी थेट संबंधित असलेल्या लोकांना दोन गावांमध्ये जाण्यास बंदी घातली आहे.

संसर्ग रोखण्यासाठी सरकार उपययोजना करत आहे. या लोकांमध्ये या आजाराची कोणतीही विशिष्ट लक्षणे दिसली नाहीत. मात्र, काहींनी ताप आणि नाकातून रक्त येणे, सांधेदुखीच्या तक्रारी केल्याचे बोलले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या आजाराची लागण झालेल्या लोकांचा काही तासांत मृत्यू होऊ शकतो.

डब्ल्यूएचओच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, एजन्सी मृत्यूचे कारण शोधण्यासाठी नमूना घेऊन त्याची चाचणी करत आहे. WHO कडून यावर नेमकं काय उत्तर येतं याकडे आता संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे.

First published:
top videos

    Tags: South africa