JOIN US
मराठी बातम्या / विदेश / Coronavirus : असा दिसतो कोरोनाव्हायरस! चीनच्या शास्त्रज्ञांनी शेअर केला पहिला फोटो

Coronavirus : असा दिसतो कोरोनाव्हायरस! चीनच्या शास्त्रज्ञांनी शेअर केला पहिला फोटो

कोरोनाव्हायरस (Coronavirus) विषाणूमुळे साऱ्या जगात हाहाकार माजला असताना, भारतात दिवसेंदिवस याचा धोका वाढत चालला आहे.

जाहिरात

आत्तापर्यंत पुण्यात 1366 जणांचा मृत्यू झाला. तर 38117 जणांना डिस्चार्ज करण्यात आलं.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

वुहान, 08 मार्च : कोरोनाव्हायरस (Coronavirus) विषाणूमुळे साऱ्या जगात हाहाकार माजला आहे. आतापर्यंत 80-85 देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण आहेत. भारतही यातून वाचू शकलेला नाही. भारतात दिवसेंदिवस कोरोना संशयित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. सध्या भारतात 34 कोरोना संशयित रुग्ण आहेत. दरम्यान चीनच्या शास्त्रज्ञांनी आता कोरोनाचा पहिला फोटो शेअर केला आहे. तब्बल महिन्याभराच्या रिसर्चनंतर शास्त्रज्ञांना कोरोनाव्हायरस शोधण्यात यश आले आहे. दक्षिण चीनमधील एका लॅबमध्ये कोरोनाव्हायरसचा शोध तंत्रज्ञानाच्या मदतीने लावण्यात आला आहे. यासाठी गेला महिनाभर चीनमधील शास्त्रज्ञ प्रयत्न करत होते. शास्त्रज्ञांनी हा विषाणू जिवंत असताना त्याची स्थिती दर्शविण्यासाठी जैविक नमुना चाचणी केली, त्यानंतर त्याचा शोध लागला. प्रमुख शास्त्रज्ञ लियू चुआंग यांनी याबाबत डेली मेलला दिलेल्या माहितीत, “या विषाणूचे स्वरूप अगदी त्याच्या स्वभावासारखेच आहे. हा विषाणू वेगाने पसरतो. त्यामुळं आता त्यावर उपाय कसे करायचे याचा शोध आम्ही घेणार आहोत” असे सांगितले. वाचा- VIDEO: कोरोनाचे रुग्ण जिथे होते ती इमारतच कोसळली, तब्बल 30 लोक ढिगाऱ्याखाली

वाचा- ‘कोरोना’मुळे खासदाराचा मृत्यू, सरकार हादरलं! रुग्णांची संख्या लाखोंच्या घरात एकीकडे चीनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असला तरी, इटली आणि इरानमध्ये परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. तर, न्यूयॉर्कमध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. न्यूयॉर्कमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 44 वरून 89वर पोहचली आहे. कोरोनामुळं फक्त जगाची अर्थव्यवस्थाच नाही तर अनेक कार्यक्रमही रद्द होत आहेत. वाचा- ‘कोरोना’मुळे कोंबडी झाली चारण्याची आणि मसाला बाराण्याचा! भारतात असा पसरतोय कोरोना भारतालाही कोरोनाचा धोका जाणवत आहे. सध्या भारतात 34 कोरोना संशयित रुग्ण आढळून आले आहेत. अलीकडील घटनांमध्ये, ओमानहून परत आलेल्या तामिळनाडूतील व्यक्तीला कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळले आहे. याशिवाय इराणहून परत आलेल्या लडाखमधील दोन जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळले आहे. अशा परिस्थितीत देशात कोरोनाची प्रकरणे सातत्याने वाढत आहेत. त्याच वेळी, संक्रमित लोकांवर उपचार चालू आहेत. वाचा- चीननंतर ‘या’ देशात Coronavirus चा कहर, 24 तासांत तब्बल 49 रुग्णांचा मृत्यू वुहान शहरातून कोरोना विषाणूची झाली लागण कोरोना विषाणूच्या संसर्गाची लागण चीनच्या वुहान शहरात गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये झाली होती आणि आतापर्यंत जगातील सुमारे साडेतीन हजार लोकांचा बळी गेला आहे. बीजिंगच्या एका न्यूज साइटने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये पाच मजली हॉटेलची इमारत कोसळताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये या घटनेतील एका साक्षीदाराने सांगितले की, ‘मी गॅस स्टेशनवर होतो, तेव्हाच मोठा आवाज ऐकू आला. मी संपूर्ण इमारत कोसळताना पाहिली. तिथे फक्त धूळ दिसत होती आणि काचेचे तुकडे पसरत होते. माझे हात पाय थरथर कापत होते. मी घाबरलो होतो.’ पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळी क्रेन आणि उत्खनन करणारी 36 आपत्कालीन बचाव वाहनं, अग्निशमन दलाच्या 67 गाड्या, 15 रुग्णवाहिका आणि 700 हून अधिक अग्निशामक कर्मचारी, डॉक्टर आणि इतर बचाव कर्मचारी उपस्थित आहे. मोठ्या प्रमाणात बचावकार्य सुरू आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या