JOIN US
मराठी बातम्या / विदेश / Black Hawk Crash : सरावादरम्यान 2 हेलिकॉप्टरची टक्कर, 9 जणांचा मृत्यू

Black Hawk Crash : सरावादरम्यान 2 हेलिकॉप्टरची टक्कर, 9 जणांचा मृत्यू

अमेरिकेच्या हवाई दलामध्ये ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर आपल्या क्षमतेमुळे ओळखले जाते. व्हिएतनामा युद्धानंतर या हेलिकॉप्टरची निर्मिती करण्यात आली होती.

जाहिरात

विशेष ऑपरेशनसाठी या हेलिकॉप्टरचा वापर केला जातो

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 30 मार्च : जगातील सर्वात शक्तिशाली असलेल्या अमेरिकेच्या हवाई दलाबद्दल धक्कादायक बातमी समोर आली आहे. अत्याधुनिक अशा ब्लॅक हॉक (Blackhawk helicopter) ला अपघात झाला आहे. हवेतच दोन हेलिकॉप्टरची टक्कर झाली आहे. या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, केंटुकी भागातील बुधवारी रात्री सरावा दरम्यान ही घटना घडली आहे. गव्हर्नर एंडी बेशियर यांनी सांगितलं की, आमच्या हवाई दलाच्या हेलिकॉप्टरचा अपघात झाला आहे. यात काही जणांचा मृत्यूची माहिती समोर आली आहे. स्थानिय अधिकारी आणि बचावपथक पोहोचले असून मदतकार्य सुरू आहे'

अमेरिकेच्या हवाई दलामध्ये ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर आपल्या क्षमतेमुळे ओळखले जाते. व्हिएतनामा युद्धानंतर या हेलिकॉप्टरची निर्मिती करण्यात आली होती. जगभरात अमेरिकेचे मित्र राष्ट्र स्पेशल फोर्समध्ये ब्लॅक हॉकचा वापर करतात. विशेष ऑपरेशनसाठी या हेलिकॉप्टरचा वापर केला जातो. या हेलिकॉप्टरचा वेग हा इतर हेलिकॉप्टरच्या तुलनेत सर्वाधिक आहे. (Breaking : रामनवमीच्या उत्सवादरम्यान धक्कादायक घटना; मंदिरातील आलेले 25 भाविक कोसळले विहिरीत ) लादेन मारण्यासाठी याच हेलिकॉप्टरचा उपयोग कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेनला अमेरिकेच्या जवानांनी ठार मारलं होतं. यावेळी स्पेशल ऑपरेशनसाठी याच ब्लॅक हॉक हेलिकॉप्टराचा वापर केला होता. अफगानिस्तानहून हे हेलिकॉप्टर जवानांसह पाकिस्तानला पोहोचलं आणि अवघ्या काही तासांमध्ये लादेनचा खात्मा करण्यात आला होता.

250 प्रवासी घेऊन जाणाऱ्या जहाजाने समुद्रात घेतला पेट; 31 मृत्यू, 18 जणांचा शोध सुरू

दरम्यान, दक्षिण फिलिपीन्समध्ये तब्बल 250 प्रवासी आणि सहकर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या एका जहाजाला आग लागल्याची घटना समोर आली आहे. जहाजाला आग लागल्यानंतर तब्बल 31 जणं बुडाले. तर काही जणं होरपळले. राज्यपालांनी गुरुवारी याबाबत माहिती दिली. (गर्भवती डॉक्टरने चालवली रुग्णवाहिका, तरुणाचे प्राण वाचवणारी देवदूत!) जहाजाला आग लागल्यानंतर प्रवासी घाबरले आणि अनेकांनी समुद्रात उडी घेतली. यानंतर नौसेना अन्य बोटीवरील प्रवाशी, मासेमारी करणाऱ्यांनी प्रवाशांना बाहेर काढले. अद्यापही अनेक प्रवाशी बेपत्ता असल्याचं सांगितलं जात आहे. जळाल्यानंतर जहाजाला बसिलनच्या तटापर्यंत नेण्यात आलं. येथे सुरक्षा कर्मचारी आणि अन्य अधिकाऱ्यांसह प्रवाशांच्या मृतदेहाचा शोध सुरू आहे. या जहाजातून तब्बल 250 जणं प्रवास करीत होते. त्यापैकी 31 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती असून 18 जणांचा शोध सुरू आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या