JOIN US
मराठी बातम्या / विदेश / अमेरिकेची मदत करणारा हा डेटाच होऊ शकतो विनाशाचं कारण; तालिबानच्या हाती लागला तर जाणार अगणित जीव

अमेरिकेची मदत करणारा हा डेटाच होऊ शकतो विनाशाचं कारण; तालिबानच्या हाती लागला तर जाणार अगणित जीव

अमेरिकेसाठी उपयुक्त ठरलेलं हे उपकरण तालिबान्यांच्या हाती लागलं हे खरं असेल, तर पुढचा विद्ध्वंस अटळ आहे.

जाहिरात

बायोमेट्रिकची ही यंत्रणा तालिबानच्या हाती लागली तर पुढचा अनर्थ अटळ आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

काबूल, 26 ऑगस्ट: अफगाणिस्तानवर (Afghanistan crisis latest) तालिबानने (Taliban) कब्जा केल्यानंतर तिथल्या नागरिकांवर मोठंच संकट कोसळलं आहे. तालिबानने नागरिकांना, तसंच महिलांनाही घाबरून न जाण्याचं आवाहन केलं आहे. तरीही पूर्वेतिहास पाहता त्यांच्यावर कोणाचाच विश्वास नाही. एकंदर सगळीच परिस्थिती तिथल्या स्थानिक नागरिकांसाठी प्रतिकूल झाली आहे. त्यातच आता अशी एक भीती वर्तवली जात आहे, की अफगाणिस्तानच्या नागरिकांचा बायोमेट्रिक डाटा (Biometric Data) हस्तगत करण्यासाठी आवश्यक असलेलं उपकरण तालिबान्यांच्या हाती लागलं आहे. हे खरं असेल, तर नागरिकांची सुरक्षितता आणखीच पणाला लागणार आहे. त्या माहितीचा दुरुपयोग करून तालिबानी अफगाणिस्तानमधल्या नागरिकांना त्रास देऊ शकतात. 2007 साली अमेरिकेच्या सैन्याने 15 लाखांहून अधिक अफगाणिस्तानी नागरिकांचा बायोमेट्रिक डेटा गोळा केला. त्यात डोळ्यांची बुब्बुळं, बोटांचे ठसे आणि चेहऱ्याच्या स्कॅनचा समावेश होता. त्यासाठी हँडहेल्ड इंटरएजन्सी आयडेंटिटी डिटेक्शन इक्विपमेंट (HIDE) या छोट्या उपकरणाचा वापर केला. नावाप्रमाणेच हे उपकरण छोटं आणि हातात पकडण्यासारखं आहे. याद्वारे तयार करण्यात आलेल्या बायोमेट्रिक डेटापर्यंत पोहोचण्यासाठी याच उपकरणाचा वापर करता येतो. तालिबानमुळे अफगाणिस्तानच्या उच्चशिक्षित मंत्र्यावर आली पिझ्झा विकण्याची वेळ अमेरिकेला (USA) साह्यभूत भूमिका घेणाऱ्या अफगाणी नागरिकांचा डेटा गोळा करण्यासाठी अमेरिकेने ही यंत्रणा वापरली. तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर अफगाणिस्तानच्या सैन्याचं सगळं साहित्य आणि उपकरणंही तालिबानच्या ताब्यात गेल्याचं बोललं जात आहे. त्यात HIDE या उपकरणाचाही समावेश आहे. या बाबीला अद्याप दुजोरा मिळालेला नाही; मात्र तसं असण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे उपकरण तालिबान्यांच्या हाती लागणं धोकादायक आहे. हे उपकरण तालिबान्यांच्या खरंच हाती लागलं असेल, तर ज्यांचा बायोमेट्रिक डेटा सिस्टीमवर आहे त्यांच्यासाठी धोका आहे. 2016 आणि 2017 साली तालिबानने देशभरात अनेक ठिकाणी प्रवासी बसेस थांबवून प्रवाशांची बायोमेट्रिक तपासणी केली होती. बसमध्ये सरकारी अधिकारी आहेत की नाही, याची खात्री तालिबान्यांना करायची होती. गंभीर! भारताचा VISA असलेले अफगाणी पासपोर्ट चोरीला, दहशतवादी करू शकतात दुरुपयोग अमेरिकेच्या बायोमेट्रिक सिस्टीमपासून प्रेरणा घेऊन अफगाणिस्तान सरकारने नागरिकांचं राष्ट्रीय ओळखपत्र देण्याचं काम सुरू केलं. त्याअंतर्गत विद्यापीठाचे विद्यार्थी, जवान आदींचा डेटा गोळा करण्यात आला. तसंच लायसेन्स आणि पासपोर्टसाठी गोळा करण्यात आलेला बायोमेट्रिक डेटाही यासाठी जमा करण्यात आला. तालिबानच्या क्रौर्याचा जिवंत पुरावा, पाहा VIDEO मिर्का मदियानो या तज्ज्ञाचं असं म्हणणं आहे, की आयरिस अर्थात डोळ्यांच्या बुब्बुळावरून माणसाची ओळख पटवण्याच्या प्रक्रियेत दोन ते तीन टक्के चुका होऊ शकतात; पण तेवढं वगळता बाकीच्या डेटाचा वापर अचूकपणे करता येऊ शकतो. त्यामुळे हा डेटा गोळा करणं आणि तो साठवणं या गोष्टी अत्यंत सुरक्षितता बाळगूनच व्हायला हव्यात. गोपनीयता आणि सुरक्षितता बाळगणं शक्य नसेल, तर बायोमेट्रिक डेटाचा उपयोग संघर्षमय क्षेत्रामध्ये, संकटात करून उपयोग नाही, असं ते म्हणतात. अफगाणिस्तानात आता काय होतंय, ते पाहावं लागेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या