JOIN US
मराठी बातम्या / विदेश / अफगाणिस्तानवरील संकटं थांबेना; तालिबानपाठोपाठ आता भूकंपाने हादरला देश, 26 जणांचा मृत्यू

अफगाणिस्तानवरील संकटं थांबेना; तालिबानपाठोपाठ आता भूकंपाने हादरला देश, 26 जणांचा मृत्यू

सोमवारी दुपारी भूकंपाच्या दोन धक्क्यांनी तुर्कमेनिस्तानला लागून असलेला सीमावर्ती भाग हादरला. यात आतापर्यंत 26 जणांचा मृत्यू झाला आहे (26 People Killed in an Earthquake in Badghis)

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

काबूल 18 जानेवारी : अफगाणिस्तानच्या पश्चिमेला असलेल्या बदगिस प्रांतात सोमवारी दुपारी भूकंपाच्या दोन धक्क्यांनी तुर्कमेनिस्तानला लागून असलेला सीमावर्ती भाग हादरला. यात आतापर्यंत 26 जणांचा मृत्यू झाला आहे (26 People Killed in an Earthquake in Badghis). एका स्थानिक अधिकाऱ्याने ही माहिती दिली. भूकंपग्रस्त दुर्गम गावांमध्ये अजूनही मदत आणि बचावकार्य सुरू असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. प्रांताच्या संस्कृती आणि माहिती विभागाचे प्रमुख बास मोहम्मद सरवरी यांनी सांगितलं की, भूकंपामुळे झालेल्या विध्वंसात अनेक घरे कोसळली आहेत. यूएस भूगर्भीय सर्वेक्षणानुसार, स्थानिक वेळेनुसार दुपारी दोनच्या सुमारास ५.३ रिश्टर स्केलचा पहिला भूकंपाचा धक्का बसला, तर ४.९ रिश्टर स्केलचा दुसरा भूकंप दुपारी चारच्या सुमारास जाणवला. मासे आणि चिप्स विक्रेत्यांना पोलिसांकडून Alert, घडतायत विचित्र गुन्हे बास मोहम्मद सरवरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रांताच्या दक्षिणेकडील कदीस जिल्ह्याचं सर्वाधिक नुकसान झालं आहे आणि सर्वाधिक जीवितहानीही इथेच झाली आहे. याआधी शुक्रवारी रात्री पाकिस्तानच्या उत्तर भागात ५.६ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के जाणवले. पाकिस्तानच्या हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, यात कोणतंही नुकसान झालेलं नाही. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील ५.६ रिश्टर स्केलच्या भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तान-ताजिकिस्तान सीमा भागात १०० किमी खोलीवर होता. पेशावर, मानशेरा, बालाकोट आणि चारसादा यासह खैबर-पख्तूनख्वामधील अनेक शहरांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. उत्तरेकडील गिलगिट-बाल्टिस्तान भागातही भूकंपाचे धक्के जाणवले.

ना शिक्षा, ना दंड! ब्रिटीश गुंडाळतायत Self Isolation चा कायदा

शुक्रवारी इंडोनेशियाच्या जावा या मुख्य बेटावरही मोठा भूकंप झाला, ज्याने राजधानी जकार्ता येथील इमारती हादरल्या, परंतु जीवित आणि मालमत्तेचं कोणतंही गंभीर नुकसान झाल्याचे तात्काळ वृत्त नाही. या भूकंपामुळे त्सुनामीचा कोणताही धोका नसल्याचं अधिकार्‍यांनी सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या