JOIN US
मराठी बातम्या / ट्रॅव्हल / या आहेत भारतातील टॉप मायलेज सीएनजी कार; बजेटमध्ये आणि आकर्षक फिचर

या आहेत भारतातील टॉप मायलेज सीएनजी कार; बजेटमध्ये आणि आकर्षक फिचर

इंधनाच्या वाढत्या दरांमुळं ग्राहक आता सीएनजी आणि इलेक्ट्रिक वाहनांचा पर्याय स्वीकारू लागले आहेत. सीएनजी वाहनांनी भारतात चांगला जम बसवलेला आहे.

जाहिरात

सीएनजी कार

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 03 नोव्हेंबर : गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये सातत्यानं वाढ होत आहे. देशातील सर्व वाहनधारकांना याची झळ बसत आहे. इंधनाच्या वाढत्या दरांमुळं ग्राहक आता सीएनजी आणि इलेक्ट्रिक वाहनांचा पर्याय स्वीकारू लागले आहेत. सीएनजी वाहनांनी भारतात चांगला जम बसवलेला आहे. सीएनजीच्या किमतीतही वाढ झालेली असली तरी पेट्रोल-डिझेलच्या तुलनेत ही वाढ कमी आहे. अशा परिस्थितीमध्ये चांगलं मायलेज असलेली सीएनजी वाहनं पेट्रोल-डिझेल वाहनांच्या तुलनेत नक्कीच जास्त फायद्याची ठरू शकतात. इंडियन मार्केटमध्ये सध्या अशा काही सीएनजी कार उपलब्ध आहेत ज्या चांगलं मायलेज देतात. शिवाय या गाड्यांची शोमरूम प्राईजही कमी आहे. या ठिकाणी अशा पाच सीएनजी कारबद्दल माहिती देण्यात आली आहे ज्या एक किलो सीएनजीमध्ये 30 किलोमीटरपेक्षा जास्त मायलेज देतात. मारुती Dzire: सर्वाधिक मायलेज देणाऱ्या सीएनजीच्या पहिल्या पाच गाड्यांमध्ये मारुती डिझायर एक आहे. कंपनीनं केलेल्या दाव्यानुसार, मारुती डिझायर एक किलो सीएनजीमध्ये 31.12 किलोमीटर मायलेज देते. मारुती एस-प्रेसो: एक किलो सीएनजीमध्ये चांगलं मायलेज देण्याबाबत मारुतीची S-Presso कार आघाडीवर आहे. ही कार एक किलो सीएनजीमध्ये 31.2 किलोमीटरपर्यंत मायलेज देते, असं कंपनीचं म्हणणं आहे. मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक अशा दोन्ही प्रकराचं ट्रान्समिशन असलेल्या या हॅचबॅक कारमध्ये चार किंवा पाच व्यक्ती बसू शकतात. मारुती सुझुकी ऑल्टो 800: मारुती सुझुकी अल्टो 800 ही सर्वोत्तम मायलेज देणाऱ्या सीएनजी कारपैकी एक आहे. ही कार एक किलो गॅसमध्ये 31.59 किलो मीटर मायलेज देते. या गाडीत 796 सीसी क्षमतेचं इंजिन असून ट्रान्समिशन मॅन्युअल आहे. ही चार ते पाच सीटर हॅचबॅक कार आहे. मारुती वॅगनआर: एक किलो सीएनजीमध्ये चांगलं मायलेज देण्याबाबत मारुतीची वॅगनआर सर्वात लोकप्रिय आहे. ही कार एक किलो सीएनजीमध्ये 34.05 किलोमीटरपर्यंत धावते. हे वाचा -  फ्लिपकार्टचा ग्राहकांना झटका; हा` पर्याय निवडल्यास द्यावं लागणार अतिरिक्त शुल्क मारुती सुझुकी सेलेरियो: मारुती सुझुकी सेलेरियो ही कार सर्वाधिक मायलेज देणारी सीएनजी कार आहे. कंपनीनं केलेल्या दाव्यानुसार, सेलेरियो कार एक किलो सीएनजीमध्ये 35.60 किलो मीटरपर्यंत प्रवास करू शकते. हे वाचा -  MG लाँच करणार देशातील सर्वात स्वस्त Electric Car, कमी किमतीत दमदार फीचर्स सध्याच्या वाढत्या इंधन दरवाढीच्या काळात वरील पाच सीएनजी कार चांगला पर्याय ठरू शकतात. त्यामुळे जर तुम्ही नवीन कार घेण्याचा विचार करत असाल तर या कारचा विचार करण्यास हरकत नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या