JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / जगात इतकी लोकसंख्याही नाही, जितक्या वेळा Google चं हे App डाउनलोड करण्यात आलं

जगात इतकी लोकसंख्याही नाही, जितक्या वेळा Google चं हे App डाउनलोड करण्यात आलं

गुगलचं व्हिडीओ स्ट्रिमिंग अ‍ॅप (Video Streaming App) यूट्यूब (YouTube) गुगल प्ले स्टोरवर (Google Play Store) 10 बिलियन म्हणजेच 1000 कोटी वेळा डाउनलोड झालं आहे.

जाहिरात

Fake Apps डाउनलोड केल्याने युजर्स पूर्णपणे हॅकर्सच्या जाळ्यात फसतात. त्यामुळे उगाच कोणतेही अ‍ॅप्स डाउनलोड करणं टाळा. तसंच कोणत्याही अनोळखी SMS किंवा Link वरही क्लिक करू नका.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 25 जुलै: सध्याच्या काळात इंटरनेट (Internet), स्मार्टफोनचा (Smartphone) वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाउन काळात तर या वापरात अधिकच वाढ झाली आहे. लहानांपासून-मोठ्यांपर्यंत सर्वच जण इंटरनेटचा वापर करतात. फेसबुक (Facebook), ट्विटर (Twitter), यूट्यूब (YouTube), व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp), इन्स्टाग्राम (Instagram) आणि इतरही अनेक सोशल मीडियाचा युजर्सकडून मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. परंतु यापैकी Google चं एक अ‍ॅप मोठ्या प्रमाणात डाउनलोड करण्यात आलं आहे. गुगलचं व्हिडीओ स्ट्रिमिंग अ‍ॅप (Video Streaming App) यूट्यूब (YouTube) गुगल प्ले स्टोरवर (Google Play Store) 10 बिलियन म्हणजेच 1000 कोटी वेळा डाउनलोड झालं आहे. यात महत्त्वाची बाब म्हणजे यूट्यूबच्या डाउनलोड्सनी (YouTube Downloads) जगातील एकूण लोकसंख्येचा आकडा ओलांडला आहे. सध्या जगाची एकूण लोकसंखा 7.88 बिलियन 788 कोटी आहे. इतके डाउनलोड्स केवळ गुगल प्ले स्टोरचे आहेत. यात अ‍ॅपल अ‍ॅप स्टोर (Apple App Store) सामिल नाही. यूट्यूबनंतर फेसबुक सर्वाधिक डाउनलोड केलं जाणार अ‍ॅप आहे. फेसबुकला गुगल प्ले स्टोरवर 7 बिलियन अर्थात 700 कोटी डाउनलोड्स मिळाले आहेत. सर्वाधिक डाउनलोड झालेल्या अ‍ॅप्समध्ये तिसऱ्या क्रमांकावर व्हॉट्सअ‍ॅप आणि चौथ्या क्रमांकावर फेसबुक मेसेंजरचा नंबर आहे. व्हॉट्सअ‍ॅप 600 कोटी आणि फेसबुक मेसेंजर 500 कोटी वेळा डाउनलोड झालं आहे. त्यानंतर पाचव्या क्रमांकावर इन्स्टाग्राम असून एकूण 3 बिलियन अर्थात 300 कोटी डाउनलोड्स झाले आहेत.

(वाचा -  गाड्यांच्या इन्शोरन्सबाबत कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल, अपघात झाल्यास नुकसान भरपाईबाबत मोठा निर्णय )

यूट्यूब इतकं प्रसिद्ध होण्यामागे नेमकं कारण काय? 9to5Google रिपोर्टनुसार, इंटरनेट स्पीड वाढल्याने आणि इंटरनेट डेटाच्या किंमतीही कमी असल्याने यूट्यूब मागील दशकात संपूर्ण जगात सर्वाधिक डाउनलोड आणि वापर केलं जाणारं अ‍ॅप ठरलं आहे. तसचं कोरोना काळात अनेकांनी यूट्यूब क्रिएटर बनूनही याचा वापर सुरू केला आणि आपला कंटेंट लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी यूट्यूब महत्त्वाचं माध्यमं ठरलं. तसंच भारतात 2020 मध्ये शॉर्ट व्हिडीओ मेकिंग प्लॅटफॉर्म टिकटॉक (TikTok) बंद झाल्याने यूट्यूबवर टिकटॉक सारखंचं हे फीचर सुरू करण्यात आलं. त्यामुळेही यूट्यूबचा मोठ्या प्रमाणात वापर वाढला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या