Laptop and Tablet: टॅबमध्ये सिम चालतं मग लॅपटॉपमध्ये का नाही? समजून घ्या फरक: टॅबमध्ये सिम चालतं मग लॅपटॉपमध्ये का नाही? समजून घ्या फरक
मुंबई, 17 सप्टेंबर: टॅबलेट हे एक असं डिव्हाईस असतं, जे लॅपटॉपसारखं थोडं लहान आणि स्मार्टफोनपेक्षा थोडं मोठं असतं. टॅबलेट आपण सहजपणे वाहून नेऊ शकतो, परंतु खिशात ठेवता येत नाही अशा आकाराचा असतो. टॅबलेटमध्ये सामान्य संगणकाप्रमाणंच RAM, ROM स्टोरेज आणि स्क्रीन असते. थोडक्यात टॅबलेट हा आकारानं मोठा असलेला स्मार्टफोनच असतो. पण त्याचे काही फीचर्स पीसीसारखे असतात. टॅब्लेट किंवा टॅब्लेट कंप्युटर सामान्यतः मोबाइलच्या ऑपरेटिंग सिस्टमप्रमाणे कार्य करतात. यात टचस्क्रीन डिस्प्ले आणि इनबिल्ट रिचार्जेबल बॅटरी असते. यात फिजिकल कीबोर्ड नसतो आणि लॅपटॉपच्या बॅटरी लाईफच्या तुलनेत टॅबलेटमध्ये बॅटरी जास्त काळ टिकते. एकूणच, काही फंक्शन्स लॅपटॉपची असतात आणि काही स्मार्टफोनची असतात. चला तर मग जाणून घेऊया टॅबलेट लॅपटॉपपेक्षा कसा वेगळा असतो, याबद्दल..
हेही वाचा: Jio 5G लाँच होण्यापूर्वी करा ‘हे’ महत्त्वाचं काम, नाहीतर वापरता येणार नाही हायस्पीड इंटरनेट