JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / Online Shopping मध्ये लागला चुना; ऑर्डर केला 1.5 लाखांचा iPhone, डिलीव्हर झालेल्या वस्तूने युजर हैराण

Online Shopping मध्ये लागला चुना; ऑर्डर केला 1.5 लाखांचा iPhone, डिलीव्हर झालेल्या वस्तूने युजर हैराण

Online shopping- एका 32 वर्षीय महिलेने 1.5 लाख रुपयांचा iPhone 13 Pro Max ऑर्डर केला होता. पण डिलीव्हरीवेळी असं काही आलं की महिला हादरुन गेली.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 7 फेब्रुवारी: ऑनलाइन शॉपिंगवेळी (Online Shopping) मोठे डिस्काउंट मिळतात. अनेक ऑफर्स दिल्या जातात, पण अशाप्रकारची खरेदी कधीतरी मोठी समस्या निर्माण करू शकते. असंच काहीस एक प्रकरण नुकतंच समोर आलं आहे. एका 32 वर्षीय महिलेने 1.5 लाख रुपयांचा iPhone 13 Pro Max ऑर्डर केला होता. पण डिलीव्हरीवेळी असं काही आलं की महिला हादरुन गेली. हा संपूर्ण प्रकार नुकताच लंडनमध्ये समोर आला. appleinsider च्या रिपोर्टनुसार, महिलेचं नाव Khaoula Lafhaily असून तिने नवा कोरा iPhone 13 Pro Max खरेदी केला. हा फोन तिने स्काय मोबाइल टेलिकॉमसह 3 वर्षाच्या कॉन्ट्रॅक्टवर 1500 पौंड भारतीय रुपयानुसार जवळपास 1.51 लाख रुपयांत खरेदी केला होता. फोनची डिलीव्हरी झाल्यानंतर तिने पार्सल ओपन केल्यानंतर हैराण झाली. डिलीव्हरी आलेल्या बॉक्समध्ये iPhone ऐवजी हँड सोप-साबण होता, ज्याची किंमत केवळ 1 डॉलर होती. महिलेने लगेच याची तक्रार Sky Mobile कडे केली. अद्यापही त्या महिलेला तिचा फोन मिळालेला नाही.

हे वाचा -  Spam Mail द्वारे पालटलं महिलेचं नशीब, जिंकली कोट्यवधींची लॉटरी

या महिलेने 24 जानेवारी रोजी iPhone 13 Pro Max खरेदी केला आणि एका दिवसांत डिलीव्हरीसाठी पेमेंट केलं. पण कंपनीने एका दिवसांत फोन पाठवला नाही. तसंच प्रोडक्टही योग्य पाठवलं नाही. कंपनीने या घटनेची चौकशी करण्याचं म्हटलं होतं. परंतु अद्यापही कंपनीने महिलेला संपर्क केलेला नाही.

हे वाचा -  ऑर्डर केलं 50,999 रुपयांचं Apple Watch, डिलीव्हर झालेल्या प्रोडक्टने युजर हैराण

अशाप्रकारची घटना पहिल्यांदाच घडलेली नाही. यापूर्वीही अनेकांना एका वस्तूच्याऐवजी दुसरीच वस्तू डिलीव्हर झाल्याचे प्रकार समोर आले आहेत. याआधीही एका महिलेने iPhone 12 Pro Max ऑर्डर केला होता. परंतु iPhone ऐवजी तिला दही डिलीव्हर करण्यात आलं होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या