नवी दिल्ली, 21 नोव्हेंबर : आजच्या काळात कोणतंही काम इंटरनेट आणि टेक्नॉलॉजीशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. त्यासाठी अनेकदा युजर्स स्मार्टफोन अथवा लॅपटॉपचा वापर करत असतात. आपल्या घरांमधून काम करत असताना WiFi चा वापर देखील अनेकजण करतात. परंतु ते काम करत असताना अनेकदा नेट स्लो होतो किंवा Router काम करत नाही. त्यामुळं आता (how to increase internet speed in wifi) वायफायचा स्पीड वाढवायचा असेल तर त्यासाठी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी, याविषयी माहिती जाणून घेऊयात. सिग्नल्सला थांबवणारे Objects ला दूर करा. घरात वाय फायचा वापर करत असताना राउटर जर दुसऱ्या खोलीत असेल तर त्याचा स्पीड कमी होतो. त्यामुळं वायफाय (improve internet connection) सेट करताना त्याला भिंतीच्या आड लावू नये, त्यामुळं त्याची स्पीड कमी होऊ शकते.
इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंपासून ठेवा दूर जेव्हा कधी वाय फाय कनेक्शन आपण घरात लावतो तेव्हा त्याला इतर इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंपासून दूर लावायला हवं. कारण इतर कनेक्शनमुळं सिग्नल क्रॅश होण्याची शक्यता असते.
WIFI च्या Antenna ची जागा बदलत रहा. WIFI कनेक्शनचा वापर करत असताना त्याला एक Antenna दिलेला असतो. त्याला चांगली रेंज येण्यासाठी आणि इंटरनेटचं सिग्नल मिळण्यासाठी त्याला वेळोवेळी बदलत रहायला हवं. त्यामुळं WIFI चा स्पीड वाढू शकतो.
उंच जागेवर WIFI ला फिट करा. WIFI च्या राउटरचा वापर करत असताना त्याला उंच जागी फिट करायला हवं. त्यामुळं त्याला सिग्नलही चांगला मिळतो आणि त्याची स्पीडही फास्ट होतो. त्यामुळं आता जर तुमच्या घरात WIFI कनेक्शनचा प्रॉब्लेम येत असेल तर या टिप्सचा वापर करायला हवा.