नवी दिल्ली, 14 जून : कोरोना काळात ऑनलाईन, डिजीटल व्यवहारात मोठी वाढ झाली आहे. तर दुसरीकडे कोरोना काळातच ऑनलाईन फसवणुकीचं (Online Fraud) प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. सायबर क्रिमिनल्स विविध प्रकारांनी लोकांची फसवणूक करत आहेत. यातच आधार कार्डचा वापर करुनही अनेकांची फसवणूक झाल्याचं समोर आलं आहे. परंतु तुमच्या आधार कार्डचा कोणी चुकीचा वापर तर केला नाही ना? कोणी कधी, कुठे कसा तुमच्या आधार कार्डचा वापर केला, हे काही सोप्या स्टेप्सने जाणून घेता येऊ शकतं. यूनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) तुम्हाला यासाठी सुविधा देतं. यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही. घरबसल्या याबाबत माहिती मिळू शकते. UIDAI च्या अधिकृत वेबसाईटवर, आधार ऑथेंटिकेशन हिस्ट्री टूल दिसेल. याद्वारे तुम्ही तुमच्या आधार कार्डचा मागील सहा महिन्यातील डेटा मिळवू शकता. - सर्वात आधी UIDAI च्या अधिकृत वेबसाईट https://uidai.gov.in/ वर जावं लागेल. - इथे My Aadhaar टॅबवर Aadhaar Services हा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा. - त्यानंतर एक नवी विंडो ओपन होईल. त्यात Aadhaar Authentication History पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा. - या प्रोसेसनंतर 12 अंकी आधार नंबर आणि कॅप्चा कोड टाकावा लागेल. आता जनरेट ओटीपीवर क्लिक करा.
- पेजवर मागील डिटेल्स पाहण्याचा पर्याय मिळेल. - इथे रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर आलेला OTP टाकावा लागेल. - त्यानंतर गेल्या काही काळात आधार कार्डचं जिथे कुठे ऑथेंटिकेशन झालं असेल, त्याची तारीख, वेळ आणि ऑथेंटिकेशन टाईप डिटेल्स मिळतील.