JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / खुशखबर! आता WhatsApp Payment वर युजर्सला मिळणार Cashback, असा घेता येईल फायदा

खुशखबर! आता WhatsApp Payment वर युजर्सला मिळणार Cashback, असा घेता येईल फायदा

WhatsApp ने सर्वात आधी भारत आणि ब्राजिलमध्ये पेमेंट्स फीचर रोलआउट केलं होतं. आता भारतात युजर्सला रिवॉर्ड देण्यासाठी या फीचरचं टेस्टिंग सुरू आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 25 सप्टेंबर : WhatsApp युजर्ससाठी चांगली बातमी आहे. लवकरच WhatsApp पेमेंट फीचरचा (WhatsApp Payment Feature) वापर करणाऱ्या युजर्सला कॅशबॅक देण्यास सुरुवात करणार आहे, WhatsApp ने सर्वात आधी भारत आणि ब्राजिलमध्ये पेमेंट्स फीचर रोलआउट केलं होतं. आता भारतात युजर्सला रिवॉर्ड देण्यासाठी या फीचरचं टेस्टिंग सुरू आहे. Wabetainfo ने सर्वात आधी नव्या कॅशबॅक फीचरची माहिती दिली. हे फीचर सध्या टेस्ट केलं जात आहे. Wabetainfo फीचर ट्रॅकरने एक स्क्रिनशॉट पोस्ट केला होता, ज्यात चॅट विंडोमध्ये एक नवं कॅशबॅक बॅनर दाखवण्यात आलं होतं. पुढील पेमेंटवर कॅशबॅक मिळवा, ऑफरचा फायदा घेण्यासाठी इथे टॅप करा, अशा आशयाचा मेसेज बॅनरवर लिहिलेला होता. पण नेमका हा कॅशबॅक कधी मिळेल, कोणत्या युजर्सला मिळेल याबाबत कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही.

क्या बात है! आता WhatsApp वर ग्रुप कॉल करणं होणार अजूनच भन्नाट; येणार ‘हे’ फिचर

Wabetainfo रिपोर्टनुसार, कॅशबॅक सर्वांना मिळेल, की केवळ असे युजर्स ज्यांनी WhatsApp वर कधीही पेमेंट केलं नाही अशा पहिल्यांदा पेमेंटचा वापर करणाऱ्या युजर्सला मिळेल याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. WhatsApp Payment वर 10 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळू शकतो. ही रक्कम फीचर रोलआउट झाल्यानंतर बदलली जाऊ शकते. लवकरच ही कॅशबॅकची सुविधा उपलब्ध होईल अशी माहिती आहे.

संबंधित बातम्या

WhatsApp वर परत मिळतील Delete झालेले Chats, पाहा सोपी ट्रिक

सध्या या फीचरवर काम सुरू आहे. ज्यावेळी भारतात हे फीचर रोलआउट होईल, त्यावेळी सर्व युजर्स WhatsApp Payment वर कॅशबॅकचा लाभ घेऊ शकतात. मात्र WhatsApp ने याबाबत अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या